‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे, रान शिवार फुलू दे...’
By admin | Published: June 25, 2017 01:41 AM2017-06-25T01:41:22+5:302017-06-25T01:41:22+5:30
‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’अशी मनात आस ठेवत वारकरी भाविकांनी भक्तीभावे विठुरायाला साकडे घातले
बारामती (पुणे) : ‘बा... विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’
अशी मनात आस ठेवत वारकरी भाविकांनी भक्तीभावे विठुरायाला साकडे घातले.
‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटतांचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं।
पाहिली शोधोनि अवघी तीर्थे।।
ऐसा नामघोष पताकांचे भार।
ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें।।’
अशा भक्तीभावात मोरोपंतनगरी बारामतीत संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा शनिवारी मुक्कामी विसावला. पालखीचे सायंकाळी पाटस मार्गावरील पांढरीचा महादेव मंदिराजवळ आगमन झाले.
खासदार अमर साबळे, सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम आदींनी स्वागत केले. पालखी सोहळा यंदा एक तास अगोदर शहरात दाखल झाला. मानाच्या अश्वाचे पूजन नगराध्यक्ष तावरे यांनी केले.