बाबा आमटेंचा गौरव टपाल तिकिटाने

By admin | Published: October 18, 2014 01:51 AM2014-10-18T01:51:31+5:302014-10-18T01:51:31+5:30

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला आहे.

Baba Ameet's pride is postponed by the postal ballot | बाबा आमटेंचा गौरव टपाल तिकिटाने

बाबा आमटेंचा गौरव टपाल तिकिटाने

Next
चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला आहे. 
केंद्र सरकारच्या डाक विभागाचे संचालक (फिलॅटली) राशी शर्मा यांनी 16 सप्टेंबर 2क्14 रोजी पाठविलेल्या पत्रद्वारे बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळविले आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी 8 ऑगस्टला केंद्रीय संचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. महाराष्ट्र विधानसभेतील 63 आमदारांच्या स्वाक्ष:यांचे निवेदन त्यांनी प्रसाद यांना सादर केले. चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2क्14मध्ये बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Baba Ameet's pride is postponed by the postal ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.