मुख्यमंत्र्यांनी टाळला बाबा बोडकेचा कार्यक्रम

By admin | Published: April 3, 2017 01:05 AM2017-04-03T01:05:03+5:302017-04-03T01:05:03+5:30

बाबा बोडके व्यासपीठावर असल्याने ऐनवेळी कार्यक्रमात बदल केला़ अर्ध्या रस्त्यातून परत फिरून गणेश कला क्रीडा येथील कार्यक्रमाला जाणे टाळले़

Baba Bodke's program was stopped by the Chief Minister | मुख्यमंत्र्यांनी टाळला बाबा बोडकेचा कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी टाळला बाबा बोडकेचा कार्यक्रम

Next


पुणे : काही महिन्यांपूर्वी गुंड बाबा बोडकेसोबतच्या थेट वर्षा बंगल्यावरच्या फोटोमुळे झालेली बदनामी चांगलीच लक्षात असल्याने मुख्यमंत्र्यांनी रविवारी बाबा बोडके व्यासपीठावर असल्याने ऐनवेळी कार्यक्रमात बदल केला़ अर्ध्या रस्त्यातून परत फिरून गणेश कला क्रीडा येथील कार्यक्रमाला जाणे टाळले़
गणेश कला क्रीडा मंच येथे फेडरेशन करंडक ग्रॅव्हिटी मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी दुपारी यशदा येथे कार्यक्रम होता़ त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमानुसार गणेश कला क्रीडा मंच येथे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणार होते़ परंतु, यशदा येथील कार्यक्रमाला येण्यास त्यांना उशीर झाला़ त्यामुळे गणेश कला येथील कार्यक्रमाची सुरुवात झाली होती़
दीपप्रज्वलन कार्यक्रमात बाबा बोडके स्टेजवर आला होता़ हे त्यांना सांगण्यात आल्याचे समजते़ यशदा येथील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा गणेश कला क्रीडा मंचकडे रवाना झाला़ परंतु, हा ताफा स़ प़ महाविद्यालय येथे आल्यानंतर अचानक त्यांचा मार्ग बदलण्यात आला़ ते थेट सर्किट हाऊसला गेले व तेथून रात्री ८़३५ वाजता विमानाने मुंबईला रवाना झाले़ (प्रतिनिधी)
>गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुंबईतील एका बिल्डरसमवेत बाबा बोडके हा वर्षा बंगल्यावर गेला होता़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका झाली होती़ त्या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडून बाबा बोडके याची माहिती नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते़ त्यामुळे रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे जाण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचे बोलले जात आहे़ हा कार्यक्रम स्वीकारताना बाबा बोडके तेथे असणार आहे, याची मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती का अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे़

Web Title: Baba Bodke's program was stopped by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.