पाकिस्तानमधील गरिबी हटविण्यासाठी पतंजली प्रयत्न करणार - बाबा रामदेव

By admin | Published: January 19, 2017 03:42 PM2017-01-19T15:42:14+5:302017-01-19T15:42:14+5:30

पाकिस्तानचा आर्थिक विकास झाला तर पाकिस्तान भारताशी युध्द करणार नाही. त्यामुळे पतंजलीच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल

Baba Ramdev will try patanjali to remove poverty in Pakistan | पाकिस्तानमधील गरिबी हटविण्यासाठी पतंजली प्रयत्न करणार - बाबा रामदेव

पाकिस्तानमधील गरिबी हटविण्यासाठी पतंजली प्रयत्न करणार - बाबा रामदेव

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19  - पाकिस्तानचा आर्थिक विकास झाला तर पाकिस्तान भारताशी युध्द करणार नाही. त्यामुळे पतंजलीच्या माध्यमातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी गुरुवारी पुण्यात सांगितले. 

एमआयटी आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 7 व्या भारतीय छात्र संससदेमध्ये रामदेव बाबा बोलत होते. 
रामदेवबाबा म्हणाले, पतंजलीचा व्यवसाय वाढवण्यासाठी दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, नेपाळ या देशांबरोबरच पाकिस्तानात जाणार आहे. तसेच पतंजलीच्या माध्यमातून मिळणाऱ्या नफ्यातून पाकिस्तानमधील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक देशातून मिळणारा नफा हा त्या देशातील विकास कामांसाठीच वापरला जाणार आहे. पाकिस्तानचा विकास झाला तर ते भारताबरोबर युध्द करणार नाही, असेही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.
 
 

Web Title: Baba Ramdev will try patanjali to remove poverty in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.