बाळगंगा प्रकल्प: बाबर यांच्यासह तिघांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: October 25, 2016 10:12 PM2016-10-25T22:12:22+5:302016-10-25T22:12:22+5:30
बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना न्यायालयीन कोठडी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 25 - बाळगंगा प्रकल्पातील कोकण पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, बी. जी. पाटील आणि आर. डी. शिंदे या तिघांना ठाण्याच्या सत्र न्यायालयाने 8 नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या आरोपपत्रची प्रत दिल्यानंतर पोलिसांना त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ही कोठडी दिली.
वर्षभरापूर्वीच याप्रकरणी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबर यांच्यासह दहा जणांविरुद्ध 3 हजार पानांचे आरोपपत्र 8 ऑगस्ट रोजी ठाण्याच्या विशेष न्यायालयात एसीबीने दाखल केले. आरोपपत्र दाखल होऊनही या प्रकरणात वरील तिघांना अटक झालेली नव्हती. न्यायालयाने त्यांना समन्स बजावल्याने पोलीस निरीक्षक विवेक जोशी यांच्या पथकाने त्यांना मंगळवारी आरोपपत्रसह हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणा:या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणा-या प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात चौकशीचे आदेश ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष चौकशी पथकाने याप्रकरणाची चौकशी करुन 25 ऑगस्ट 2क्15 रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीष बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणो पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग 1 कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, कोलाडचे तत्कालीन सहाय्यक अभियंता राजेश रिठे, कोलाडचे तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कंन्स्ट्रक्शन आणि एफ.ए. इंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री आदी दहा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.