बबनराव लोणीकरांचे 'ते' वक्तव्य आक्षेपार्ह : चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 02:32 PM2020-02-02T14:32:16+5:302020-02-02T14:34:23+5:30
पक्ष कोणताही असला तरीही राजकीय नेत्यांनी भाषण करातांनी शब्दांचा वापर मोजून मापून केला पाहिजे.
औरंगाबाद : माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकरमहिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. तर अशा विधानाचे समर्थन करणार नसून बबनराव लोणीकरांचे 'ते' वक्तव्य आक्षेपार्हच असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी परतूरमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यासाठी बबनराव लोणीकर मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, '' शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान हवे असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मराठवाड्यातील परतूनहून निघाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी कार्यकर्ते जमवून आणले पाहिजेत. प्रसंगी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या हिरॉइन बोलावू, हिरॉइन नाही मिळाती तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच", असे विधान लोणीकर यांनी केले होते.
तर यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्यात की, पक्ष कोणताही असला तरीही राजकीय नेत्यांनी भाषण करातांनी शब्दांचा वापर मोजून मापून केला पाहिजे. तर लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा मी समर्थन करणार नाही. तसेच त्यांनी केलेले विधान हे आक्षेपार्हचं असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. तर या प्रकरणी महिला आयोग निश्चितचं दखल घेतील असेही त्या यावेळी म्हणाल्यात.