बाबासाहेबांनी प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By admin | Published: April 14, 2017 02:16 PM2017-04-14T14:16:38+5:302017-04-14T14:18:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी मनकापूर येथील डिजिधन मेळाव्याच्या कार्यक्रमात मराठीतून भाषणा सुरुवात केली.
भाषणापूर्वी डिजिधन व्यापार योजना व लकी ग्राहक योजनेच्या विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य गरीबांसाठी कायम प्रेरणादायी
डॉ. आंबेडकरांना आयुष्यात अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला, पण ही कटुता, बदल्याची भावना त्याच्या वागणुकीतून, संविधानातून किंवा अधिकार क्षेत्रात दिसली नाही
बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक भारतवासियाला आपली स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते
बाबासाहेबांनी प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी दिली
2022 पर्यंत देशाला महापुरुषाच्या स्वप्नातील भारत बनवायचे आहे
देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली नाही, मात्र देशासाठी जगण्याची संधी मिळाली
प्रभावितपणे पुढे जाण्याची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळते
बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा ठरणार आहेत
बाबासाहेबांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.पण त्यांच्या विचारांच्या उंचीने सर्व घटकांचा विकास पाहिला
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी वैचारिक मंत्र दिला, त्यांच्या या प्रेरणेला आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे
आहे. देशाने 175 गेगावाट उर्जेचे स्वप्न पाहिले आहे.त्याची सुरवात झाली आहे
पुढील पाच वर्षात प्रत्येक तरुणाने देशाचा विकास करण्याचं उद्दिष्ट बाळगावं
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होतील २०२२ मध्ये तेव्हा प्रत्येक गरीबाचे एक घर असावे असे आमचे स्वप्न
सुखवस्तू कुटुंबातही मुलांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून कमी रोकड देतात
प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थातील घटक आहे. डिजिधनच्या माध्यमातून त्यांना या प्रवाहात आणले आहे
पुढील पाच वर्षात प्रत्येक गरीबाकडे स्वतःचं घर असावं
देशातील प्रत्येक गरिबातल्या गरिबाला घर देण्याचे स्वप्न आहे. ते 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे.
21 व्या शतकात देशाला आधुनिक स्वरूपात पाहायचे असेल तर ऊर्जा हा महत्त्वाचा घटक
भीम अॅप अर्थव्यवस्थेतील एक महाघटक ठरणार आहे, हे अॅप अर्थव्यवस्थेतील एक महारथी ठरणार आहे
भीम अॅपसारखी सुविधा इतर कोणत्याही देशात नाही. ही प्रगतीची सुरुवात आपल्या देशाने केली आहे
देशात आर्थिक बदल कसा होऊ शकतो हे भीम अॅप शिकवेल. इतर देशही या आर्थिक प्रगतीचा बारकाईने अभ्यास करतील