बाबासाहेब पुरंदरेंमुळे वाढला जातीय तणाव - दिग्विजय सिंह
By admin | Published: July 26, 2015 05:20 PM2015-07-26T17:20:24+5:302015-07-26T17:20:24+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळेच जातीय तणाव वाढत असून त्यांचे लिखाण तणावनिर्मितीसाठी पूरकच ठरले असे वादग्रस्त मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळेच जातीय तणाव वाढत असून त्यांचे लिखाण तणावनिर्मितीसाठी पूरकच ठरले असे वादग्रस्त मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदूंचा राजा बनवण्यात आले, मात्र शिवाजी महाराजांनी नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम केले असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी एका कार्यक्रमानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह पुण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रोत्साहन दिले होते. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवण्यात आले. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतिसाह तोडून मोडून सांगण्याची सवयच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला होता.