Babasaheb Purandare Birthday: बाबासाहेब पुरंदरेंनी चक्क सोन्याचा गोफ लेखकाला काढून दिला; पण नंतर राज ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नव्हती!

By अमेय गोगटे | Published: July 29, 2021 04:17 PM2021-07-29T16:17:10+5:302021-07-29T16:24:52+5:30

Babasaheb Purandare Birthday: memory which shows the bonding between Raj Thackeray and Shivshahir : प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्या हातावर ठेवला. सभागृह स्तब्ध झालं होतं.

Babasaheb Purandare Birthday: memory which shows the bonding between Raj Thackeray and Shivshahir | Babasaheb Purandare Birthday: बाबासाहेब पुरंदरेंनी चक्क सोन्याचा गोफ लेखकाला काढून दिला; पण नंतर राज ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नव्हती!

Babasaheb Purandare Birthday: बाबासाहेब पुरंदरेंनी चक्क सोन्याचा गोफ लेखकाला काढून दिला; पण नंतर राज ठाकरेंनी जे केलं त्यालाही तोड नव्हती!

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध सुपरिचितच आहेत.शिवशाहीर आणि राज ठाकरे यांचं भावनिक नातं उलगडणाऱ्या एका हृद्य प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी २००७ मध्ये मिळाली होती.

- अमेय गोगटे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचं चरित्र महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळीच शिवशाहिरांच्या घरी जाऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं आणि आशीर्वाद घेतले. ठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध सुपरिचितच आहेत. विशेषतः, राज ठाकरे यांच्या मनात शिवशाहिरांबद्दल असलेला आदर अनेकदा भाषणांमधून स्पष्टपणे जाणवला आहे. बाबासाहेब पुरंदरेंकडून ऐकलेल्या गोष्टी, त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांचा उल्लेख ते अनेकदा करतात. शिवशाहीर आणि राज ठाकरे यांचं भावनिक नातं उलगडणाऱ्या एका हृद्य प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी २००७ मध्ये मिळाली होती. Babasaheb Purandare Birthday: memory which shows the bonding between Raj Thackeray and Shivshahir 

रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरचं पुस्तक. एका शिक्षकानं 'पॅशन' म्हणून वेळात वेळ काढून, पदरचे पैसे खर्च करून लिहिलेलं. प्रकाशझोतात न आलेले काही किल्ले, त्यांचा इतिहास शोधण्यासाठी लेखकाने बरीच खटपट केली होती. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकाशनाला आले होते आणि त्यांच्यासोबत होते राज ठाकरे. रिपोर्टर म्हणून हा कार्यक्रम कव्हर करायला गेलो होतो. दोघंही उत्तम वक्ते असल्यानं, पुस्तक प्रकाशनाच्या 'जनरल' बातमीपेक्षा वेगळी काहीतरी मस्त बातमी मिळेल, अशी खात्री होती. पण, पुढे जे घडलं, तो माणूस म्हणून समृद्ध करणारा सोहळा ठरला. 

प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. लेखकाने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्या हातावर ठेवला. सभागृह स्तब्ध झालं होतं आणि शिक्षक-लेखकही भारावला होता - शहारला होता. या पुस्तकासाठी झालेल्या खर्चाचा भार शिक्षकावर पडू नये, ही शिवशाहिरांची भावना होती. सगळंच शब्दांच्या पलीकडचं होतं. अनेकांचे डोळे पाणावले होते. 

त्यानंतर, राज ठाकरे यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सगळ्यांची मनं जिंकली. ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा गोफ अनमोल आहे. तो त्यांना परत करा आणि पुस्तकाचा जो काही खर्च झालाय तेवढ्या रकमेचा चेक माझ्या घरी येऊन घेऊन जा'', असा 'आदेशच' त्यांनी लेखकाला दिला आणि पुन्हा एकदा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.  

टीपः पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव खरोखरच आठवत नाहीए. गुगलवर बरंच शोधलं, पण २००७ मध्ये आजच्यासारखा डिजिटल मीडिया नव्हता आणि स्मार्टफोनही. तेव्हा 'झी २४ तास' ही एकमेव मराठी वृत्तवाहिनी होती आणि मी त्यावर या व्हिडीओचं पॅकेज केलं होतं. पण, ते यू-ट्युबवर वगैरे अपलोड झालेलं नसल्यानं पुरावा म्हणून काही देता आलेलं नाही. पण, काही प्रसंग आपल्या मनावर कायमचे कोरले जातात, त्यापैकी हा एक आहे.   

Web Title: Babasaheb Purandare Birthday: memory which shows the bonding between Raj Thackeray and Shivshahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.