विठ्ठलाच्या दर्शनाविना परतले बाबासाहेब पुरंदरे

By admin | Published: May 10, 2017 02:21 AM2017-05-10T02:21:35+5:302017-05-10T02:21:35+5:30

विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंगळवारी आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मंदिराच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या

Babasaheb Purandare returns without a visit to Vitthal | विठ्ठलाच्या दर्शनाविना परतले बाबासाहेब पुरंदरे

विठ्ठलाच्या दर्शनाविना परतले बाबासाहेब पुरंदरे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंगळवारी आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मंदिराच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांनी चुकीच्या द्वारातून प्रवेश नाकारल्याने ते विठ्ठलाच्या दर्शनाविना परतले.
पुरंदरे हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांच्या गाडीने पश्चिमद्वार येथे आले. ते व्ही.आय.पी. गेटला जाण्याऐवजी पश्चिम द्वार येथून मंदिरात प्रवेश करत होते. पोलिसांनी त्यांना थांबवत व्ही.आय.पी गेटने दर्शनासाठी जाण्यास सांगितले. उपस्थित व्यापाऱ्यांनी व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी हे महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आहेत. त्यांना येथून सोडा, असे सांगितले.
व्ही. आय. पी. गेट समोर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वागतासाठी मंदिर समितीचे कर्मचारी थांबले होते. पुरंदरे हे पश्चिमद्वार शेजारील लाडू सेंटरच्या शेजारी उन्हात बाकावर बसून होते. त्यांना पोलिसांनी तेथून मंदिरात प्रवेश करुन दिल्याने पुरंदरे तेथूनच माघारी गेले.
मंदिर समिती व पोलिसांकडून पुरंदरे यांना चुकीची वागणूक मिळाल्याने पश्चिमद्वार येथे विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पश्चिमद्वार व्यापारी संघटना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सावरकर युवा मंच, पेशवा युवा मंच, रुक्मिणी पटांगण व्यापारी या संघटनांचे कार्यकर्ते, मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पाय दुखत असल्याने माघारी-
खाजगी कामानिमित्त बाबासाहेब पुरंदरे हे पंढरपूरला आले होते. ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले, परंतु पश्चिमद्वार येथील पोलिसांनी त्यांना ओळखले नाही. पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, मी स्वत: व्ही.आय.पी. गेटला थांबतो इथे या अन्यथा पश्चिमद्वारनेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात जा. नागरिकांची गर्दी अधिक झाल्याने तसेच पुरंदरे यांचे पाय दुखत असल्याने ते माघारी जाण्यास तयार झाले. असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक सुनील शिरगावकर म्हणाले.

Web Title: Babasaheb Purandare returns without a visit to Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.