समाजकल्याणच्या प्रमाणपत्रांवर आता बाबासाहेबांची छबी

By admin | Published: November 5, 2015 02:58 AM2015-11-05T02:58:54+5:302015-11-05T02:58:54+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून प्रेरणा घेण्यासाठी यंदाचे जयंती वर्ष (१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६) ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे.

Babasaheb's picture is now on the social welfare certificates | समाजकल्याणच्या प्रमाणपत्रांवर आता बाबासाहेबांची छबी

समाजकल्याणच्या प्रमाणपत्रांवर आता बाबासाहेबांची छबी

Next

- हणमंत गायकवाड,  लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानातून प्रेरणा घेण्यासाठी यंदाचे जयंती वर्ष (१४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६) ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त आकर्षक छबी तयार करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाची सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांवर १ नोव्हेंबरपासून बाबासाहेबांची ही छबी अनिवार्य करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबरपासून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व कागदपत्रांवर ‘समता व सामाजिक न्याय वर्ष’ असा मजकूर व बाबासाहेबांचे छायाचित्र असलेली छबी लावण्यात येणार आहे. त्यावर ‘१२५ वी जयंती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. लातूर विभागाने सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली असून, कार्यालयामार्फत निर्गमित होणाऱ्या सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रांवर ही छबी प्रसिद्ध केली आहे. अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राष्ट्रीय सुरक्षा, विदेशनीती, महिला सक्षमीकरण याबाबतचे त्यांचे विचार परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा व प्रदर्शन भरवून समाजासमोर आणले जाणार आहेत, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त संजय दाणे यांनी दिली.

Web Title: Babasaheb's picture is now on the social welfare certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.