बाबूश मोन्सेरात - 50 लाखांच्या सौद्यातील मध्यस्थ महिला शरण

By admin | Published: May 7, 2016 01:18 PM2016-05-07T13:18:20+5:302016-05-07T13:18:20+5:30

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी शनिवारी सकाळी रोझी फेर्रास ही ताळगावातील महिला शरण आली आहे

Babush Monserrate - Arbitrator in the Rs 50 lakhs intermediary women | बाबूश मोन्सेरात - 50 लाखांच्या सौद्यातील मध्यस्थ महिला शरण

बाबूश मोन्सेरात - 50 लाखांच्या सौद्यातील मध्यस्थ महिला शरण

Next
>पणजी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी शनिवारी सकाळी रोझी फेर्रास ही ताळगावातील महिला शरण आली आहे. या प्रकरणात येथील सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात यास शुक्रवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तो गजाआड आहे. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश याच्यावर दाखल केलेला आहे. आपल्या सावत्र आईने आपल्याला पन्नास लाख रुपयांना विकल्याचा जबाब संबंधित मुलीने दिलेला आहे. या आईसही पोलिसांनी गजाआड केले आहे.  मुलीची आई आणि बाबूश यांच्यात मुलीच्या विक्रीसाठी मध्यस्थी केल्याचा आरोप फेर्रास हिच्यावर आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या रायबंदर येथील कार्यालयात ही महिला शरण आली. तिची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच तिलाही अटक होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Babush Monserrate - Arbitrator in the Rs 50 lakhs intermediary women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.