नागपूरमध्ये जन्माला आले 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेले बाळ
By Admin | Published: June 11, 2016 11:30 AM2016-06-11T11:30:14+5:302016-06-11T12:22:01+5:30
शहरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - शहरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसऑर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला आहे. ८ महिने वाढ झालेले हे बाळ असून डॉक्टर यश बानाइत आणि चमु त्याच्यावर उपचार करताहेत
'हर्लेक्विन' हा एक गंभीर जेनेटिक डिसऑर्डर असून ३ लाखांमध्ये असे एखादेच बाळ जन्माला येते. या डिसऑर्डरमुळे व्यक्तीच्या त्वचेवर परिणाम होतो. असा डिसऑर्डर असलेल्या नवजात बालकांच्या शरीरावर अतिशय कडक त्वचेचे आवरण असते. अशा मुलांच्या त्वचेची सातत्याने खूप काळजी घेणे गरजेचे असते. दरम्यान हे बाळ किती दिवस, किती महीने वा आणखी किती काळ जगेल हे सांगता येणार नाही. यापूर्वी पाकिस्तान मधे अशा प्रकारचे बाळ जन्माला आले होते.
तीन लाख जन्माला आलेल्या बाळांमधून असे बाळ जन्माला येते, वैद्यकीय भाषेत याला Harlequin म्हणतात. जन्मजात अश्या बाळाला त्वचा राहत नाही, म्हणून बाळ विचीञ दिसते. - डॉ. यश बाणाईत