ट्रेनच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म, ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित

By admin | Published: April 26, 2017 09:25 AM2017-04-26T09:25:57+5:302017-04-26T09:25:57+5:30

धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती झाल्यानंतर ट्रॅकवर पडलेलं बाळ आश्चर्यकारकरित्या वाचलं असून पुर्णपणे सुरक्षित आहे

The baby gave birth to the baby in the toilet of the train, the baby got safe on the track | ट्रेनच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म, ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित

ट्रेनच्या शौचालयात महिलेने दिला बाळाला जन्म, ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - एका महिलेने ट्रेनच्या शौचालयातच बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती झाल्यानंतर ट्रॅकवर पडलेलं बाळ आश्चर्यकारकरित्या वाचलं असून पुर्णपणे सुरक्षित आहे. रत्नागिरीहून दादरला येणा-या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. महिलेला तिच्या नवजात बाळासहित रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या दोघेही सुखरुप आहेत. 
 
मूळची पश्चिम बंगालची असणारी 26 वर्षीय चंदना शाह ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी शौचालयात असतानाच तिची प्रसूती झाली आणि जन्माला आलेलं बाळ कुसा स्टेशनजवळ ट्रेनमधून थेट ट्रॅकवर पडलं. चंदना शाहने ट्रेन थांबण्यासाठी आरडाओरड सुरु केली. ट्रेन तात्काळ थांबवून बाळाला ट्रॅकवरुन उचलण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे बाळ पुर्णपणे सुरक्षित होतं. कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: The baby gave birth to the baby in the toilet of the train, the baby got safe on the track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.