खांबाचा करंट लागल्यामुळे नागपूरमध्ये बालकाचा करुण अंत

By admin | Published: July 4, 2016 01:26 PM2016-07-04T13:26:02+5:302016-07-04T13:26:22+5:30

क्रिकेट खेळताना मैदानातील खांबाचा करंट लागल्यामुळे १२ वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली.

The baby's compassionate end in Nagpur due to the continuous pivot | खांबाचा करंट लागल्यामुळे नागपूरमध्ये बालकाचा करुण अंत

खांबाचा करंट लागल्यामुळे नागपूरमध्ये बालकाचा करुण अंत

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ -  क्रिकेट खेळताना मैदानातील खांबाचा करंट लागल्यामुळे १२ वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
 
मोहम्मद अनिस मोहम्मद युनूस शेख (वय १२) हा रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास चिटणीस पार्कमध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. मैदानातील पोलला त्याचा हात लागताच अनिसला जोरदार करंट लागला. ते पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. गोळा झालेल्या लोकांनी अनिसला मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच अनिस राहत असलेल्या भालदारपु-यात तीव्र शोककळा पसरली. अनिसचे वडील युनूस यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: The baby's compassionate end in Nagpur due to the continuous pivot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.