“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 03:10 PM2023-11-14T15:10:39+5:302023-11-14T15:10:58+5:30

Bacchu Kadu News: छगन भुजबळांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे.

bacchu kadu claims sharad pawar and bjp coming together is not possible | “शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत

“शरद पवार-भाजप एकत्र येणे शक्य नाही, नवीन चूल मांडणार नाही”; बच्चू कडू यांचे ठाम मत

Bacchu Kadu News: आताच्या घडीला मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षण यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, असे दावे फेटाळत शरद पवार आणि भाजप एकत्र येणे शक्य नाही, असे ठाम मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

शरद पवार आणि भाजप एकत्र येण हे शक्य नाही. शरद पवार हे भाजपसोबत जाऊन नवीन चूल मांडणार नाहीत, असे सांगत, अजित पवार हेच अर्थमंत्री आहेत. राज्याच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे निधी मिळत नाही हे नाराजीचे कारण असू शकत नाही. अजित पवार यांच्या नाराजीच वेगळे काही कारण असू शकते, अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली आहे. 

छगन भुजबळांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते

प्रत्येक पक्ष ओबीसीच्या बाजूने उभा राहत आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंचा रोल सध्या समोर आला नाहीय. ओबीसीला पकडून राजकारण करायचे पक्षांचे ठरले आहे. मराठा विरुद्ध इतर समाज एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. छगन भुजबळ यांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते, अशी टीका करताना, फडणीसांनी म्हटले आहे जो ओबीसी के साथ रहेगा वही राज करेगा. माझ्याविरुद्ध ओबीसींना आक्रमक केले जाणार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी ही आग लावण्याच काम सुरू झाले आहे. मराठा खतरे में है, ओबीसी खतरे में है, धनगर खतर में हें, असे सांगून पुन्हा वाद पेटवला जाईल, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. 

दरम्यान, प्रत्येक पक्षाची आपली राजकीय खेळी वेगवेगळी असते. प्रत्येक पक्षाने ठरवायचे आहे की खेळी किती बेईमानीने खेळायची किंवा सात्विक पणाने खेळायची. राजू शेट्टींच्या आंदोलनासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढावा. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे. वेळ पडल्यास राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होईन, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी दिली.


 

Web Title: bacchu kadu claims sharad pawar and bjp coming together is not possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.