“भाजपा अन् उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 05:58 PM2024-02-24T17:58:25+5:302024-02-24T18:00:08+5:30

भाजपा वापरून फेकून देणारा पक्ष आहे. आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

bacchu kadu criticised bjp and praised shiv sena cm eknath shinde | “भाजपा अन् उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

“भाजपा अन् उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bacchu Kadu News: एकाबाजूला लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली असताना, भाजपाचे मित्रपक्ष नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी भाजपाबाबत विधान केले होते. याला बच्चू कडू यांनी समर्थन केले आहे. भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. 

भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा वापर करून फेकून देतो, असे ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. असाच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केला होता. भाजप छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचे महादेव जानकर म्हणाले होते. बच्चू कडू यांनीदेखील असेच आरोप करताना, भाजपवर टीका केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.  

मित्रांना सोबत घ्यायचे अन् काम झाले की सोडून द्यायचे

मित्रांना सोबत घ्यायचे अन् काम झाले की सोडून द्यायचे, अशीच भूमिका भाजपाची राहिलेली आहे. भाजपा आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले. अमरावती लोकसभेवर प्रहारचा दावा कायम आहे. पक्षाकडे पाच-सहा उमेदवारांचा पर्याय आहे. नवनीत राणांना उमेदवारी द्यायच्या मुद्द्यावर कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत. भाजपा वापरून फेकून देणारा पक्ष आहे,आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवरायांचा पुतळा बसवताना आमदार रवी राणा यांनी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरुन अमरावातीत राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. 
 

Web Title: bacchu kadu criticised bjp and praised shiv sena cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.