Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 04:00 PM2024-08-13T16:00:32+5:302024-08-13T16:18:05+5:30

Bacchu Kadu : मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

Bacchu Kadu : "I'm president in name only, polls will have to be noticed",bacchu kadu expressed regret over handicaped welfare department along with slams government ladki bahin yojana maharashtra | Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Bacchu Kadu : "मी फक्त नावापुरता अध्यक्ष, निवडणुकीत दखल घ्यावी लागेल", बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Bacchu Kadu : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच, प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, महायुतीत सामील असलेल्या प्रहार जनशक्तीचे प्रमुख  बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे. जर सरकार आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू दिला आहे.  

याचबरोबर, दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, "आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात, हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो. सरकारनं जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे."
 
लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला आहे. बच्चू कडू म्हणाले, "काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली, घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात, याचा विसर या लोकांना पडला आहे. यांना वाटतं आपल्या बाप दादांच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे. सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा, तो राहणारच आहे." 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, "तुम्ही लाडकी बहीण आणली १५०० रुपये देत आहे. दिव्यांगांचा महिना दीड हजार केला का? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना, विधवा महिलांना का बाजूला ठेवता? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल, तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही."

Web Title: Bacchu Kadu : "I'm president in name only, polls will have to be noticed",bacchu kadu expressed regret over handicaped welfare department along with slams government ladki bahin yojana maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.