Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... तर घरात घुसून मारण्याची हिंमत'; रवी राणा थांबेचनात; बच्चू कडूंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:27 PM2022-11-02T18:27:10+5:302022-11-02T18:27:38+5:30

Ravi Rana Vs Bacchu Kadu Latest News: बच्चू कडू यांच्या सभेनंतर रवी राणा यांनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली. यानंतर राणा यांनी कडू यांना थेट इशारा दिला आहे.

Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... So dare to break into the house and beat you'; Ravi Rana againe direct warning to Bachu Kadu Amravati Politics | Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... तर घरात घुसून मारण्याची हिंमत'; रवी राणा थांबेचनात; बच्चू कडूंना थेट इशारा

Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... तर घरात घुसून मारण्याची हिंमत'; रवी राणा थांबेचनात; बच्चू कडूंना थेट इशारा

googlenewsNext

राज्यात शिवसेना - एकनाथ शिंदे वाद बाजुलाच राहिला, दोन अपक्ष आमदारांमध्येच सध्या जुंपली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही काळापासून टीका सुरु झाली आहे. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला असताना पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. बच्चू कडूंच्या सभेमधील वक्तव्यानंतर राणा यांनी आज घरात घुसून मारण्याची हिंमत असल्याचा इशारा कडू यांना दिला आहे. 

कडू यांच्या सभेनंतर राणा यांनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा यांनी मी सन्मानाने दोन पावले मागे झालो. कडू चार पावले मागे गेले. जर आम्हाला सातत्याने कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे. कडू कसे आमदार होतात तेच पाहतो, अशा शब्दांच राणा यांनी कडू यांना इशारा दिला आहे. 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची घमेंड होती, त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या मुख्यमंत्र्याला घमेंड होते, त्याच्यावर हीच वेळ येते. कडू कसे आमदार होतात, पुढच्या निवडणुकीला कसे निवडून येतात ते मी पाहतो, असा इशारा राणा यांनी दिला आहे. घाबरत कोणीच नाही. मात्र प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. काही चुका त्यांच्याकडून झाल्या त्यांनी पावले मागे येऊन दिलगीरीही व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देखील माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मीही दोन पावले जाऊन माफी मागितली, असे राणा म्हणाले. 

यावर कडूंचीही प्रतिक्रिया आली आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी भाषणात कोथळा काढू म्हटलं, त्यात रवी राणाचं उल्लेख केला नव्हता. कुणी आमच्यावर विनाकारण आरोप करत असेल तर त्याचा कोथळा बाहेर काढू असं बोललो होतो. आता रवी राणांनी ते स्वत:वर ओढावून घेणे हा त्यांचा विषय आहे. राहिला विषय घरी येऊन मारण्याचा तर मी तयार आहे. त्याने घरी यावं अथवा अन्य कुठे बोलवावं मी तिथे येतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिले. 

कडू काय म्हणालेले...

मेळाव्यात बच्चू कडूंनी रवी राणा यांना पहिलीच वेळ होती म्हणून माफ करतोय, पण यापुढे अशी आगळीक घडली तर पुन्हा माफी नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे.  गरीबाची पोरगी पळाली की ती पळाली, तर श्रीमंताची पोरगी पळाली तर लव्ह मॅरेज होतं अशातला हा प्रकार आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत ते मला सांगा. खरंतर बंडखोरच आज पहिल्या पंक्तीत आहेत. आज सोशल मीडिया सुद्धा पैशांनी चालतो. जो चलता है वही बिकता है. आता एकदा चूक झाली म्हणून ठिक आहे. पहिली वेळ आहे म्हणून माफ करतोय. पण प्रहारच्या वाटेत यापुढे कुणी येईल तर प्रहारचा वार कसा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही गांधींना मानतो पण भगतसिंग देखील आमच्या डोक्यात आहे. यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही", असं बच्चू कडू म्हणाले. 

Web Title: Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... So dare to break into the house and beat you'; Ravi Rana againe direct warning to Bachu Kadu Amravati Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.