Bachchu Kadu: ‘...तर त्यांच्या घरासमोर हात कलम करेन’, बच्चू कडूंनी फेटाळून लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 09:16 PM2022-02-27T21:16:28+5:302022-02-27T21:18:52+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Bhagatsingh Koshyari | Minister Bachchu Kadu denies allegations of financial fraud | Bachchu Kadu: ‘...तर त्यांच्या घरासमोर हात कलम करेन’, बच्चू कडूंनी फेटाळून लावले आरोप

Bachchu Kadu: ‘...तर त्यांच्या घरासमोर हात कलम करेन’, बच्चू कडूंनी फेटाळून लावले आरोप

Next

अकोला: राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)  यांच्यावर बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी तक्रार दाखल केली होती. पण, बच्चू कडू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तक्रार आल्यानंतर भगतसिंह कोश्यारींनी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे आदेश शनिवारी दिले. त्याबाबतची माहिती वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, पुंडकरांवर पलटवारही केला.

काय म्हणाले बच्चू कडू?
आज बच्चू कडू अकोला दौऱ्यावर गेले, तिथे त्यांनी ज्या रस्त्यावरुन आरोप करण्यात आला, त्या रस्त्याची पाहणी केली. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा असा हा रस्ता आहे. यावेळी बोलताना बच्चू कडूंनी पुंडकर यांच्यावर टीकाही केली. 'पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशिल संस्था हडप केली. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. मी एक रुपयाही खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर स्वतःचे हात कलम करेन. पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंवर काय आरोप आहे?
शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बच्चू कडूंनी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Bhagatsingh Koshyari | Minister Bachchu Kadu denies allegations of financial fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.