'मेड फॉर इच अदर'ची वादग्रस्त जाहिरात भाजपाकडून मागे
By admin | Published: February 18, 2017 03:19 PM2017-02-18T15:19:31+5:302017-02-18T15:25:39+5:30
चल हट... भाजप मुंबई, मेड फ़ॉर इच अदर...' ही सर्वत्र दिसणारी जाहिरात वादात सापडली असून भाजपाने ती मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम जोरात सुरू असून मतदानाला अवघे काहीच दिवस उरलेले असतान भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मनसेसह सर्वच पक्षांनी प्रचारात झोकून दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीही कंबर कसून प्रचारासाठी उतरले असून फक्त सभ आणि रॅली नव्हेत तर जाहिरातबाजीच्या माध्यमातूनही प्रचार जोरदारपणे सुरू आहे. अशीच एका जाहिरात भाजपानेही केली आहे, मात्र ती वादग्रस्त ठरल्याने मतदारांचे त्यांच्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्याचा फटका बसण्याचीच चिन्हे अधिक आहेत. 'चल हट... भाजप मुंबई, मेड फ़ॉर इच अदर...' ही जाहिरात सध्या सर्वत्र दिसत आहे, मात्पर जाहिरातीच्या शेवटी एक तरूण व तरूणी एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहे. त्यामुळे ही जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या असून जाहिरात वादात सापडली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपातील वरिष्ठ नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जाहिरातीला नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले असून भाजपाच्या सोशल मीडिया सेललाही खडसावल्याचे समजते. त्यामुळे अखेर ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे.