पर्वणीकडे पाठ; त्रुटींचा आढावा घेणार

By Admin | Published: September 1, 2015 02:04 AM2015-09-01T02:04:27+5:302015-09-01T02:04:27+5:30

वर्ष-दीड वर्षापासून कुंभमेळ्याचे नियोजन करूनही येथील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला अपेक्षेहून खूपच कमी भाविकांनी उपस्थिती लावल्याने नियोजनातील त्रुटींचा जिल्हा

Back to the Mount; Review the errors | पर्वणीकडे पाठ; त्रुटींचा आढावा घेणार

पर्वणीकडे पाठ; त्रुटींचा आढावा घेणार

googlenewsNext

नाशिक : वर्ष-दीड वर्षापासून कुंभमेळ्याचे नियोजन करूनही येथील पहिल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीला अपेक्षेहून खूपच कमी भाविकांनी उपस्थिती लावल्याने नियोजनातील त्रुटींचा जिल्हा प्रशासनाने सोमवारी आढावा घेतला. सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांनी कुंभमेळ्याकडे पाठ फिरवल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
सोमवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निवडक अधिकाऱ्यांकडून पहिल्या शाही स्नानाला भाविकांनी अपेक्षित हजेरी न लावल्याचा कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत एक-दोन दिवसांत सर्व यंत्रणांची बैठक होणार आहे. त्यात प्रत्येक अधिकाऱ्याने कारणांची चिकित्सा करून बैठकीत त्याचा ऊहापोह करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते. त्या अनुषंगाने प्रशासनाला युद्धपातळीवर तयारी करावी लागते. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठीची अतिदक्षताच पोलीस-प्रशासनाच्या अंगलट येऊन भाविकांनी सारे नियोजन फोल ठरविले. ८० लाख ते १ कोटी इतके भाविक येण्याची शक्यता गृहीत धरलेली असताना प्रत्यक्ष १० लाखांवरच भाविकांनी हजेरी लावली.
भाविकांच्या रोडावलेल्या संख्येची कारणमीमांसा करताना पोलीस यंत्रणेवरच सारे खापर फोडले जात असून, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही खासगीत ते मान्य केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी महसूल खात्याच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी पर्वणीच्या व्यवस्थेचे फेरनियोजन करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला. भाविकांना करावी लागणारी पायपीट, त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मा व्हॅलीचे बसस्थानक, शहरांतर्गत पार्किंगची ठिकाणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनीही कुंभमेळ्याच्या कामात अधिकाऱ्यांना आलेला अनुभव, नियोजनाबाबतच्या त्रुटी व
उपाय, याची चिकित्सा करण्याचे आदेश दिले. एक-दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीत भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याबाबत निर्णय घेतला जाणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Back to the Mount; Review the errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.