बॅकस्टेज कलाकारांना राखीव बेड : उद्धव

By admin | Published: February 20, 2016 03:22 AM2016-02-20T03:22:37+5:302016-02-20T03:22:37+5:30

भारतात बॉलीवूडप्रमाणेच रंगभूमीला वेगळे स्थान आहे. त्यामुळे या नाट्यभूमीचे वैभव साकारण्यासाठी महाराष्ट्रात या रंगभूमीचे संग्रहालय उभारण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख

Backstage Artists Reserved Beds: Uddhav | बॅकस्टेज कलाकारांना राखीव बेड : उद्धव

बॅकस्टेज कलाकारांना राखीव बेड : उद्धव

Next

बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, ठाणे : भारतात बॉलीवूडप्रमाणेच रंगभूमीला वेगळे स्थान आहे. त्यामुळे या नाट्यभूमीचे वैभव साकारण्यासाठी महाराष्ट्रात या रंगभूमीचे संग्रहालय उभारण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि ९६व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद््घाटक उद्धव ठाकरे यांनी केली. या संग्रहालयाच्या रूपाने नाट्यवैभव प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या, अशी सादही त्यांनी नाट्य परिषदेला घातली.
नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ही घोषणा केली. शिवसेना या नाट्यभूमीच्या सदैव सोबत आणि पाठीशी असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमच्या महापौरांचा कार्यकाळही अडीच वर्षांचा असतो. त्या कार्यकाळातही काही करायला मिळाले नसल्याची ओरड होते. परंतु, अधिकार केवळ मागून मिळत नाहीत, तर मिळालेले अधिकार गाजवायचे असतात, असा सल्लाही त्यांनी मावळत्या संमेलनाध्यक्ष फय्याज यांना दिला. मोहन जोशी यांच्याकडेदेखील कोणी मागणारे आहे, हे ऐकून बरे वाटले, असेही त्यांनी सांगितले. नाट्यभूमी ही फार वेगळी आहे. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर त्याचे सतत शो होतात. परंतु, नाटकाचे तसे नसते. समोर प्रेक्षक असतो आणि कलाकारांची मानसिकता नसेल तरीही त्याला आपली भूमिका ताकदीने पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांचे कौतुकच
करावे लागेल.
संमेलनाध्यक्षांपेक्षा उद्घाटकांचाच तोरा !
बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्घाटक म्हणून लाभल्याने संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्यापेक्षा उद्घाटकांचाच तोरा अधिक होता. ठाकरे हे व्यासपीठावर लिफ्टने वर आले. त्या वेळी तुताऱ्या व संबल यांचा दणदणाट झाला. त्या वेळी आजी-माजी संमेलनाध्यक्ष हे अगोदरच व्यासपीठावरील खुर्च्यांवर येऊन बसले होते.
स्वागताध्यक्ष व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वप्रथम ठाकरे यांचा सत्कार करण्याकरिता लगबग करीत होते. मात्र, उद्धव यांनीच शिंदे यांना संमेलनाध्यक्षांचा प्रथम सत्कार करण्याची सूचना केली. त्यामुळे सर्वप्रथम गवाणकर यांचा सत्कार झाला. शिंदे यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई आदी शिवसेनेच्या नेत्यांचे सत्कार केल्यावर मग नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर महापौर व अन्य मान्यवरांचे सत्कार करण्याची जबाबदारी सोपवली गेली.
ठाण्यातील मंडळींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नाट्यगृहाची मागणी काही वर्षांपूर्वी केली. त्या वेळी अगोदर महापालिकेची सत्ता द्या, मग नाट्यगृह देतो, असे ठाकरे यांनी सांगितले
होते. सत्ता आल्यावर गडकरी
रंगायतन उभे राहिले, याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिल्यावर वर्षभरात महापालिका निवडणूक असल्याची कुजबुज झाली. उद्धव यांनी मंत्री व पालकमंत्री केल्यानेच स्वागताध्यक्ष झालो, असे सांगत शिंदे यांनी नेतृत्वाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी हे नाट्यसंमेलन भव्यदिव्य केल्याबद्दल शिवसैनिकांना धन्यवाद देतो, असे मत व्यक्त केले व त्यात लाजायचे कशाला, असा सवाल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Backstage Artists Reserved Beds: Uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.