मागासवर्गीय कर्मचारी करणार सरकारविरोधात मतदान; पदोन्नती आरक्षणावरून नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:10 AM2019-02-16T02:10:33+5:302019-02-16T02:10:47+5:30

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रोखल्याचा आरोप करत सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशनने (आयबीसेफ) जाहीर केला आहे.

Backward staff to vote against the government; Angry over the promotion reservation | मागासवर्गीय कर्मचारी करणार सरकारविरोधात मतदान; पदोन्नती आरक्षणावरून नाराज

मागासवर्गीय कर्मचारी करणार सरकारविरोधात मतदान; पदोन्नती आरक्षणावरून नाराज

Next

मुंबई : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रोखल्याचा आरोप करत सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशनने (आयबीसेफ) जाहीर केला आहे. मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नतीचा निर्णय घेण्याची मागणी करत राज्यातील २७ संघटनांनी एकत्रितरीत्या शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले. सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा निषेध करत संघटनेने आगामी निवडणुकांत सरकारविरोधात मतदान करण्याचा ठराव संमत केल्याचे संघटनेचे सरचिटणीस एस.के. भंडारे यांनी सांगितले.
भंडारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासलेपण तपासण्यासाठी कोणत्याही सांख्यिकी आकडेवारीची गरज नसून राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांनाच पदोन्नतीतील आरक्षण लागू करत लाखो मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाºयांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले आहे. त्यात खुल्या प्रवर्गाला आर्थिक लाभासह पदोन्नतीचा लाभ देण्यात सरकारकडून तत्परता दाखवण्यात येते. याउलट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या बिगर मागासवर्गीय कर्मचाºयांना संरक्षण देण्यातही सरकार पुढाकार घेते. सरकारच्या या उदासीनतेमुळे कर्मचाºयांत नाराजी आहे. परिणामी, आरक्षणाविरोधात असलेल्यांना मतदान करणार नाही, अशा निर्णयाची घोषणा आंदोलनात केल्याचे भंडारे यांनी सांगितले.
फेडरेशनचे अध्यक्ष सुनील निरभवणे म्हणाले की, खोट्या जातीच्या दाखल्याच्या आधारे नोकरी मिळवलेल्या कर्मचाºयांना सेवेतून काढून टाकण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Backward staff to vote against the government; Angry over the promotion reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.