30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी 'बुरे दिन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Published: December 24, 2016 04:23 PM2016-12-24T16:23:49+5:302016-12-24T18:31:12+5:30

50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि भ्रष्ट, अप्रामाणिक लोकांचा त्रास वाढायला सुरुवात होईल.

'Bad Day' for the corrupt people after December 30 - Prime Minister Narendra Modi | 30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी 'बुरे दिन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी 'बुरे दिन' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 24 - 50 दिवसानंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि भ्रष्ट, अप्रामाणिक लोकांचा त्रास वाढायला सुरुवात होईल असे महत्वपूर्ण विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेत केले. काळा पैसा सफेद करणा-यांनी बँकांची मदत घेतली तिथेच खरी सुरुवात झाली. त्यांनी स्वत: बरोबर बँक कर्मचा-यांनाही गोत्यात आणले. भ्रष्टाचार करणा-यांना सोडणार नाही, त्यांचे काही चालणार नाही, सरकार बदलले आहे त्यांनी लक्षात घ्यावे असे मोदी यांनी सांगितले.
 
शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजनानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असल्याचे सांगितले. देशातील जनता भ्रष्टाचार, काळापैसा सहन करणार नाही, तुम्हाला मोदींची, कायद्याची भिती वाटत नसली तरी चालेल पण तुम्हाला 125 कोटी जनतेचा धाक वाटलाच पाहिजे असे मोदी म्हणाले. हे सरकार भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
आम्ही छत्रपती शिवरायांचे सेवक आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रकाश जावडेकर यांनी सहा महिन्यांत सर्व आवश्‍यक परवानगी दिल्यामुळे स्मारकाचा मार्ग मोकळा झाला - देवेंद्र फडणवीस.
आधीच्या सरकारने फक्त शिवस्मारकाने घोषणा केल्या - देवेंद्र फडणवीस.
मी शिवा होऊ शकत नाही ,जीवा होण्याची संधी दे तुळजाभवानी आई - देवेंद्र फडणवीस.
 
महाराष्ट्राचे किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्त झाले पाहिजेत, परवानगीचे अधिकार दिल्लीत नको महाराष्ट्रात सरकारकडे द्या - उद्धव ठाकरे.
शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यासारख बांधा - उद्धव ठाकरे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी शिवसैनिकांची घोषणाबाजी.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात.
 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 3 लाख कोटींचे रस्ते बांधणार - नितीन गडकरी.
जानेवारी महिन्यात अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे काम सुरु होणार - नितीन गडकरी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींही शिवभक्त असल्याचा अभिमान आहे - नितीन गडकरी.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णअक्षरांनी लिहून काढावा असा दिवस आहे - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
 

Web Title: 'Bad Day' for the corrupt people after December 30 - Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.