पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब!
By admin | Published: July 12, 2016 02:48 PM2016-07-12T14:48:25+5:302016-07-12T15:06:45+5:30
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील ११ पैकी ३ ‘बॅरेजेस’ तुडूंब भरली आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष काही अंशी भरून काढण्यासाठी तब्बल ७१६ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवरील ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ उभारण्यात आली आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संबंधित सर्वच बॅरेज प्रकल्पात मोठा जलसंचय झाला असून ११ पैकी ३ प्रकल्प तुडूंब भरले आहेत.
वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खो-याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. तो दुर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रूवारी २००९ रोजी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. त्यापैकी गणेशपूर, जुमडा आणि वरूड बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून इतरही बॅरेजेसच्या पाणीपातळीने ५० टक्क्याचा पल्ला ओलांडला आहे.