Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 01:30 PM2024-11-23T13:30:39+5:302024-11-23T13:33:14+5:30
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Badnera Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : गेल्या १५ वर्षांपासून बडनेऱ्याची जागा जिंकून आमदारकीची हॅटट्रिक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विजयाचा चौकार लगावण्यासाठी सर्वशक्तीनिशी रणमैदानात उतरले आहेत. सोबतच, शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी सुनील खराटे यांना गेल्याने सन २०१९ मध्ये ४० टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रीती बंड या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, तर भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असलेले तुषार भारतीय यांनी अपक्ष म्हणून नामांकन कायम ठेवत बडनेऱ्याची लढत तिरंगी केली.
रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्या रामाचं बाण या जिल्ह्यात माझ्या मतदारांनी चालवून दाखवलं. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, त्याचा बदला माझ्या जिल्ह्यातील लोकांनी घेतला आहे" असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री हे भाजपाचेदेवेंद्र फडणवीस होणार यात काही शंका नाही. राहुल गांधींचा खोटारडेपणा हा लोकसभेत चालला पण विधानसभेत चालला नाही असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
"अल्प मतांनी जेव्हा माझा पराभव झाला. तेव्हा माझ्या जिल्ह्यातील असे बरेच कुटुंब होते, ज्यांनी दोन दोन दिवस जेवण केलं नव्हतं. आमच्या रामाचं बाण या जिल्ह्यात माझ्या मतदारांनी चालवून दाखवलं. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, त्याचा बदला माझ्या जिल्ह्यातील लोकांनी घेतला आहे. लाडकी बहीण, लोकसभेचा राग हे सगळं आता दिसत आहे. सहा महिन्यापासून लोकं हे मतदान कधी येईल याची वाट पाहत होते."
"मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आमचे देवेंद्र फडणवीस होणार यात काही शंका नाही. राहुल गांधींचा खोटारडेपणा हा लोकसभेत चालला पण विधानसभेत चालला नाही. तोच खोटारडेपणा आम्ही उचलून बाहेर फेकला आणि यामध्ये लोकांनी आमची साथ दिली आहे" असं नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीने बडनेयाची जागा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवि राणा यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे ते महायुतीचे संयुक्त उमेदवार ठरले आहेत.