पोटगीप्रमाणे पुरुषांना विरह भत्ता मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2015 02:58 AM2015-11-30T02:58:19+5:302015-11-30T02:58:19+5:30

महिलांना ज्याप्रमाणे पोटगी मिळते त्याप्रमाणे पुरुषांनाही विरह भत्ता मिळावा. प्रत्येक जिल्'ात पुरुष दक्षता विभाग निर्माण व्हावा,

As per the baggage, men should get a different allowance | पोटगीप्रमाणे पुरुषांना विरह भत्ता मिळावा

पोटगीप्रमाणे पुरुषांना विरह भत्ता मिळावा

Next

कोल्हापूर : महिलांना ज्याप्रमाणे पोटगी मिळते त्याप्रमाणे पुरुषांनाही विरह भत्ता मिळावा. प्रत्येक जिल्'ात पुरुष दक्षता विभाग निर्माण व्हावा, असे काही प्रमुख ठराव पुरुष हक्क संरक्षण समितीच्या १८ व्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आले. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला.
रविवारी सकाळी अधिवेशनातील ‘स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे?’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये संगीता ननावरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या, पुरुषांना सांभाळून घेण्याची कला स्त्रीमध्येच असते. प्रत्येक सासू ही आई होऊ शकते. त्याचप्रमाणे सूनही मुलगी होऊ शकते. सून व सासूंनी आपल्यातील मतभेदांबाबत एकत्र बसून मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात.
या वेळी सामाजिक कार्यकर्त्या कमल शिर्के, तेजस्विनी मरोळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, पहिल्या सत्रात ‘कुटुंबाच्या हक्कासाठी पुरुष हक्क समिती’ या विषयावर चर्चासत्र झाले, तसेच शेवटच्या सत्रात अन्यायग्रस्त व्यक्तींना कायदेविषयक सल्लाही देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: As per the baggage, men should get a different allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.