बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Published: April 7, 2017 02:45 AM2017-04-07T02:45:03+5:302017-04-07T02:45:03+5:30
पाभरे फाटा ते म्हसळा बाजारपेठेतून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
म्हसळा : बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समिती म्हसळा यांच्या विद्यमाने गुरुवारी विविध मागण्यांसाठी म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन कारण्यात आले. पाभरे फाटा ते म्हसळा बाजारपेठेतून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात महेश जाधव, आकाश पेरवी, सलीम उकये, बाबाजान पठाण, महादेव पाटील, सुरेश पाटील,श्रीपत धोकटे आदी मान्यवर सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकशाहीला घातक ईव्हीएम मशिन रद्द करून बॅलेट पेपरचा वापर, ओबीसी, भटक्या विमुक्त जातींसाठी आरक्षणाची तरतूद, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा, कोळी, आदिवासी जात प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द, औद्योगिक कॉरिडोर आणणारे सेझ, सी.आर.झेड. आणि आयझोनमधील जाचक कायदे त्वरित रद्द करणे, ओ.बी.सी. च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुस्लीम समाजाला सच्चर कमिशनच्या शिफारशी लागू करणे, अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करून कायद्याची स्वतंत्र यंत्रणा उभी करणे, कोपर्र्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करणे आदी २२ मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. (वार्ताहर)