बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

By Admin | Published: April 6, 2017 04:35 PM2017-04-06T16:35:30+5:302017-04-06T17:01:56+5:30

संकेत गोयथळे रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० ...

Baked Cooking Mango | बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

Next

संकेत गोयथळे

रत्नागिरी, दि. 6 - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० दिवसात पूर्णपणे कागदाच्या पिशवीत (बॅगिंग तंत्रज्ञानाने) आंबा पिकवला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यापर्यंत पोहोचली व जिल्हाधिकाऱ्यांनीही साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात झगडे यांचे कौतुक केले.
नित्यानंद झगडे यांची असगोलीतील डोंगरात आंब्याची बाग आहे. सुमारे १५० ते २०० फूट उंच डोंगरात ते संपूर्ण कुटुंबासह आंब्याच्या बागेतच वास्तव्य करतात. शेतीतील वेगवेगळे प्रयोग करणारे तरुण शेतकरी अशी झगडे यांची ओळख आहे. उंच डोंगरात जलसंधारणासाठी बोअरिंग पुनर्भरणसह इतर प्रयोग करुन त्यांनी येथील पाणीपातळी वाढवली आहे. पूर्वी मार्चमध्ये पूर्णपणे कोरडी होणारी विहीर आज पाण्याने भरली आहे. या त्यांच्या प्रयोगाची तत्कालिन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनीही पाहणी केली होती. नित्यानंद झगडे यांनी दापोली कृषी विद्यापीठामध्ये आंबा पुनरुज्जीवन व बॅगिंग तंज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे झगडे हे गेली तीन वर्षे हा प्रयोग करत आहेत. यासाठी त्यांना गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या आंब्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे या फळाला नैसर्गिक आकर्षक रंग, मनमोहक सुगंध असून, कसलाही डाग किंवा ओरखडा फळावर नाही. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाने फळमाशीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळते. झगडे यांनी यावर्षी आंबा पिकासाठी कुठलीही रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेली नाहीत. केवळ शेणखत, गांडूळखत, जिवामृत व गोमूत्र याचा वापर करुन दर्जेदार आंबापीक घेण्यात यश मिळवले आहे.

प्रशासनाकडून दखल
नित्यानंद झगडे यांनी बॅगिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आंबा पिकवला आहे. या तंत्रज्ञानाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. साधे परंतु प्रभावी तंत्रज्ञान अशा शब्दात त्यांनी या तंत्रज्ञानाची प्रशंसा केली आहे.

https://www.dailymotion.com/video/x844v2m

Web Title: Baked Cooking Mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.