बाळासाहेबांनीही घेतली होती 'अशीच' भूमिका; राज ठाकरेंचा मोदीविरोध पटवण्यासाठी मनसेची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:49 AM2019-03-25T11:49:45+5:302019-03-25T11:51:16+5:30

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे.

Balasaheb had also taken the 'same' role | बाळासाहेबांनीही घेतली होती 'अशीच' भूमिका; राज ठाकरेंचा मोदीविरोध पटवण्यासाठी मनसेची शक्कल

बाळासाहेबांनीही घेतली होती 'अशीच' भूमिका; राज ठाकरेंचा मोदीविरोध पटवण्यासाठी मनसेची शक्कल

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रास सत्तेवर असणाऱ्या भाजपासरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी  मनसे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या या निर्णयावरून उटल सुटल चर्चांना सुरुवात झाली. मात्र लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयामधील साम्य शोधणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
निवडणूक लढवली नाही याचा अर्थ तलवार म्यान केली, असा होत नाही तर भविष्यातील मोठ्या लढाईसाठी तलवार परजली जात आहे. असा दावा  या व्हिडिओ क्लिपमधून मनसेकडून केला जात आहे. सुरुवातीच्या काळात कट्टर विरोधकांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्याचा फायदा काँग्रेसच्या एका गटाला झाला होता. मात्र बाळासाहेबांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला होता. 

इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी जाहीर केली तेव्हाही बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना भवनावर हल्ला झाला होता. त्यानंतर 1979 मध्ये काँग्रेसने शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. त्याची परतफेड म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. अशा प्रकारे बाळासाहेबांनी विखारी लाटेत राजकीय चातुर्य दाखवत संघटना पुढे नेली. असे या व्हिडिओत म्हटले आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेही आगामी काळात वाटचाल करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title: Balasaheb had also taken the 'same' role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.