बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धवनी दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:37 AM2017-12-10T03:37:58+5:302017-12-10T03:38:45+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे

 Balasaheb had the most tortured citations | बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धवनी दिल्या

बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धवनी दिल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सर्वाधिक यातना उद्धव ठाकरेंनीच दिल्या. मातोश्रीवर घडलेल्या सर्व प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. या सर्व घटना एकदिवशी मी महाराष्ट्र पुढे मांडेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिले नाही. याउलट मातोश्रीवर त्या काळात काय काय घडले, हे मी माझ्या डोळ््यांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला. मी काम करीत होतो, त्या वेळची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन-आसमानचा फरक आहे. सध्याच्या शिवसेनेत ५ टक्केही प्राण राहिला नाही. तत्त्व आणि शब्दाप्रमाणे चालणारी शिवसेना आता तशी अजिबात दिसत नाही. सत्तेचा लाभ घेऊन केवळ पोकळ इशारे देत उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात कोणताही दम नाही. काय आणि कधी बोलावे, हे कळण्याइतपत त्यांना राजकारणाचा गंधही नाही. कुठेही गेले, तरी ते १८ मिनिटांपेक्षा जास्त बोलू शकत नाहीत. त्या १८ मिनिटांपैकी १६ मिनिटे ते नुसते इतरांवर टीका करण्यातच घालवतात.

 नऊ नगरसेवक राणेंच्या भेटीला

सांगली-मिरज महापालिकेच्या नऊ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत, सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. राणे यांनी वसंतदादा स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

Web Title:  Balasaheb had the most tortured citations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.