बाळासाहेब ठाकरे
By Admin | Published: May 5, 2016 05:06 AM2016-05-05T05:06:12+5:302016-05-05T05:06:12+5:30
२३जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक. त्यांची प्रतिमा रोखठोक नेत्याची राहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले बाळासाहेब
२३जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक. त्यांची प्रतिमा रोखठोक नेत्याची राहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेले बाळासाहेब मुळात अतिशय कुशल आणि यशस्वी व्यंगचित्रकार होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात फ्री प्रेस जर्नलमध्ये आर.के. लक्ष्मण यांच्या खांद्याला खांदा भिडवत काम केले. त्यांच्यातील व्यंगचित्रकार भाषणांदरम्यान रोखठोक टिप्पणी, चुटकी आणि मथळ्यांमधून समोर येत राहिला. १९६० मध्ये त्यांनी काढलेले ‘मार्मिक’ हे मासिक त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांमुळे नेहमी चर्चेत राहिले होते. १९६६ मध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यांनी सामना (मराठी) आणि ‘दोपहर का सामना’ (हिंदी) ही दोन शिवसेनेची मुखपत्रे प्रकाशित केली. मात्र, राजकीय व्यग्रतेमुळे त्यांचे व्यंगचित्र क्वचितच कागदावर उतरत होते. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे राजकारणासोबतच व्यंगचित्रांच्या जगाचे मोठे नुकसान झाले आहे.