Uddhav vs BJP: "बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 08:29 PM2023-05-12T20:29:48+5:302023-05-12T20:30:44+5:30

"पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नापास झाले"

Balasaheb Thackeray was fighter but Uddhav Thackeray is crying baby slammed by BJP Chandrashekhar Bawankule | Uddhav vs BJP: "बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले"; भाजपाचा खोचक टोला

Uddhav vs BJP: "बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले"; भाजपाचा खोचक टोला

googlenewsNext

Uddhav Thackeray vs BJP: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत. ते आता रडोबा झाले आहेत. खरे तर उद्धव ठाकरे स्वत: रणांगणातून पळून गेले होते, असा खोचक टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष गेला तरी ते सुधरत नाहीत, असा टोमणाही त्यांनी मारला. सोलापूर येथे प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, "नैतिकता हा शब्द उद्धव ठाकरेच्या तोंडून चांगला वाटत नाही. त्यांनी २०१९ मध्येच नैतिकता सोडली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, हे त्यांनी मान्य केलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जवळ केली. त्यामुळे सर्वात आधी नैतिकता ही त्यांनी सोडली."

"पक्ष प्रमुख म्हणून ते नापास झाले. ते महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकले नाही, पक्षाला नेतृत्व देऊ शकले नाही. ते आता ते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे म्हणत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्याचवेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे संवैधनिक सरकार तयार झाले. उद्धव ठाकरे वारंवार असंवैधानिक सरकार असल्याची ओरड करीत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्हाला कोर्टात जावे लागेल", असा इशारा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला.

"स्वतः शरद पवार यांना असं वाटत आहे की माझा निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा नेता निवडण्यात चूक झाली. उद्धव ठाकरेंच्या रक्तांमध्ये विकासाचे व्हिजन नाही," याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विकास कामांवर मतदान मिळेल!

"प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार व्यक्तींना भाजपाशी जोडण्याची रचना केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. जेथे आमचे आमदार नाहीत, तेथे आमचा आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने आमचे पुढील काळात प्रयत्न राहणार असून, त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघांचा प्रवास आपण करणार आहोत. आम्हाला आम्ही केलेल्या विकास कामांवर मतदान मिळेल. कोणावर टीका करून मते मिळवायची गरज भासणार नाही", असा दावाही बावनकुळे यांनी केला.

डबल इंजिन प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारे!

मंत्रीमंडळ विस्तार करणे हा पूर्णतः एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार, डबल इंजिनचे सरकार राज्याला निश्चितपणे प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: Balasaheb Thackeray was fighter but Uddhav Thackeray is crying baby slammed by BJP Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.