मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

By Admin | Published: August 24, 2016 08:58 PM2016-08-24T20:58:17+5:302016-08-24T20:58:17+5:30

शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला

Balasaheb Thackeray's name for the Central Vetranana project | मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ १ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी युतीबाबतचे संकेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे़

मध्य वैतरणा धरणाला नानाशंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती़ मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानंतर या धरणाला त्यांचे नाव देण्याचे शिवसेनेने ठरविले़ तशी मागणीही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती़ परंतु गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजपाच्या मैत्रीत फुट पडून उभय पक्षांनी असहकार पुकारला़ त्यामुळे शिवसेनेचा हे स्वप्न भाजपा पूर्ण होऊ देईल का, याबाबत शंका व्यक्त होत होती़

या नामकरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मिळत नसल्याने हा संशय आणखी बळावला होता़ परंतु अखेर १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे़ या कार्यक्रमात शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत उभय पक्षांची काय भूमिका असेल, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे़ मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़

रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़ १९९३ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्प आखण्यात आला़ त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हे धरण बांधण्यात येणार होते़ मात्र या प्रकल्पासाठी पावणेदोन लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता़

अखेर बीड जिल्ह्यात तेवढ्याच वृक्षांचे पुर्नरोपण केल्यानंतर २००७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली़ चार वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ विलंबाने वाढविला खर्च १९९३ मध्ये चितळे समितीने मध्य वैतरणा धरणाची शिफारस केली़ २००९ मध्ये धरणाचे काम सुरु झाले़ जवहारलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत या प्रकल्पाला निम्मा निधी मिळाला़ या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी अपेक्षित होता़

मात्र अनेक वर्षांच्या दिरंगाईमुळे हा खर्च दोन हजार कोटींवर पोहोचला़ धरणाचे वैशिष्ट जलदगतीने पूर्ण होणारे जगातील हे ९ वे आरसीसी धरण आहे़ या धरणाची उंची १०२़४ मीटर एवढी आहे़ भाकरा नंगाल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे मोठे धरण आहे़

Web Title: Balasaheb Thackeray's name for the Central Vetranana project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.