लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:16 PM2017-12-26T12:16:14+5:302017-12-26T13:47:09+5:30
हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे.
लोणावळा- हिंदु हदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेणाचा हुबेहुब पुतळा भारतातील पहिलं मेणाचं संग्रहालय असलेल्या लोणावळ्यातील सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांच्या हातांनी हा पुतळा साकारण्याची किमया केला आहे.
लंडन येथिल मादाम तुँसाच्या धर्तीवर भारतातील पहिले वॅक्स म्युझियम लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम या नावाने दहा वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते. या ठिकाणी देश पातळीवरील विविध राजकिय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड व हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे याठिकाणी बनविण्यात आले आहेत. हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे व मान्यवर उपस्थित होते.
वॅक्स म्युझियममधील बाळासाहेब यांच्या पुतळ्याने या संग्राहलयाला एक उंची निर्माण होईल, अशी भावना व्यक्त केली जात असून सिंहासनावर विराजमान असलेला बाळासाहेबांचा मेणाचा पुतळा पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. लवकरच संग्राहलयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रिपाईचे नेते रामदास आठवले, वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांचे पुतळे दाखल होणार असल्याचे सुनिल कंडलूर यांनी सांगितलं.