मोदींच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठीच : बाळसाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 05:11 PM2020-02-06T17:11:52+5:302020-02-06T17:14:11+5:30
अडीच कोटी शेतकऱ्यांना तर दुसऱ्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नाही.
मुंबई : देशातील पाच कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेतील दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही व अडीच कोटी शेतकऱ्यांना तर दुसऱ्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नाही. माहितीच्या अधिकारात कृषी व शेतकरी कल्याण योजनातर्फेच ही माहिती कार्यकर्त्याला दिली आहे. त्यामुळे यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
थोरात यांनी ट्वीटरवर पोस्ट करत म्हंटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त घोषणाबहाद्दर आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा फक्त टिव्ही आणि वर्तमानपत्रात बातम्या येण्यासाठी असतात, अंमलबजावणीसाठी नाही. त्यांच्या घोषणांचा लाभ त्यांच्या प्रसिद्धीशिवाय इतर कोणालाही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे" थोरात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त घोषणाबहाद्दर आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा फक्त टिव्ही आणि वर्तमानपत्रात बातम्या येण्यासाठी असतात, अंमलबजावणीसाठी नाही. त्यांच्या घोषणांचा लाभ त्यांच्या प्रसिद्धीशिवाय इतर कोणालाही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. pic.twitter.com/VU2qEs7bDW
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 6, 2020
तर महाराष्ट्रातील 42.34 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत स्वता:चे नाव नोंदवले होते. त्यापैकी 36 लाख 98 हजार जणांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली. तर दुसऱ्या हप्त्याची रक्कम 31 लाख 53 हजार शेतकऱ्याच्याच खात्यात जमा झाली आणि तिसरा हप्ता मिळणाऱ्यांची संख्या आणखी कमी झाली व रक्कम केवळ 27 लाख 67 हजार शेतकऱ्यांना मिळाली.