राज्यात आता नव्या स्वरुपात सातबारा - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:46 PM2021-08-02T12:46:57+5:302021-08-02T12:47:30+5:30
राज्यात नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
पुणे : राज्यात नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
महसूल दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरित फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्तनोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा प्रारंभ रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.
ई-पीक पाहणी आता शेतकरीच नोंदवणार
राज्यात तलाठ्यांच्या ऐवजी प्रत्येक शेतकरीच ई-पीक पाहणीची नोंदणी करणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. तसेच येणाऱ्या काळात विभागाच्या वतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. थोरात म्हणाले की, येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या ई-पीक पाहणीसाठी टाटा ट्रस्टचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे.