बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 06:08 PM2020-04-03T18:08:44+5:302020-04-03T18:15:14+5:30

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे

Balasaheb Thorat should not critisied of PM Narendra Modi activities that promote morale of Indian ; Chandrakant Patil | बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये 

बाळासाहेब थोरातांनी पंतप्रधान मोदी यांच्या मनोबल वाढवणाऱ्या उपक्रमांची चेष्टा करू नये 

googlenewsNext

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महालसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सामान्य लोकांबद्दल काही आपुलकी नसेल तर त्यांनी गप्प बसावे पण त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या उपक्रमाची कुचेष्टा करू नये व गंभीर संकटाच्या वेळी जनतेचे मनोबल खच्ची करू नये, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.  

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरु आहे. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित करताना पाच तारखेला देशभरातील नागरिकांना रात्री दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावर टीका केली आहे. या टीकेला आता पाटील प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात काढलेल्या पत्रकात त्यांनी दिवे लावण्याच्या कृतीचे समर्थन करत थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. 

ते म्हणाले की, 'कोरोनाच्या विरुद्धचे युद्ध हे वेगळे युद्ध असून त्यामध्ये प्रत्येक नागरिक सैनिक आहे. संयम राखून देशाचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पकतेने आणि गांभीर्याने रविवारी रात्री नऊ वाजता पारंपरिक दिवे लावण्याचे आवाहन केले असताना त्याला इव्हेंट समजणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच प्रसंगाचे गांभीर्य नाही. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते.  

पुढे ते म्हणाले की, 'सामान्य लोकांचा निर्धार ही या लढाईतील सर्वात महत्त्वाची बाब आहे. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जनतेने संयम पाळून सोशल डिस्टन्सिंग करणे हाच कोरोनाच्या साथीवरील प्रभावी उपाय सध्या आहे. संपूर्ण समाज संयमाने व एकजुटीने या अनोख्या संकटाचा सामना करत आहे. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते'. 

ते म्हणाले की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या गरीबांना चार घास मिळावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने तीन महिन्यांचे रेशनचे धान्य एकदम देण्यासाठी योजना जाहीर केली व त्यानुसार धान्य उपलब्ध केले. पण राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने गरीबांना मिळणारे मोफत धान्यही अटी घालून अडवून ठेवले आहे. विरोधासाठी विरोध करताना सर्वसामान्य जनतेला असे वेठीला धरणे योग्य नाही. पंतप्रधान म्हणून काय करावे याचे सल्ले देणाऱ्या थोरात यांनी आधी मोदीजींनी गरीबांसाठी पाठवलेले धान्य त्यांच्यापर्यंत पोहचेल याची सरकार म्हणून खबरदारी घ्यावी व नंतरच फुकटचे सल्ले द्यावेत'.

Web Title: Balasaheb Thorat should not critisied of PM Narendra Modi activities that promote morale of Indian ; Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.