Maharashtra Winter Session 2022: “पुढील १५ वर्ष मुंबईत आमचीच सत्ता, आता गुवाहाटीला जायची गरज नाही”: शहाजीबापू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:54 PM2022-12-21T15:54:57+5:302022-12-21T15:56:10+5:30

Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.

balasahebanchi shiv sena shinde group shahaji bapu patil said we do not have need to go at guwahati again | Maharashtra Winter Session 2022: “पुढील १५ वर्ष मुंबईत आमचीच सत्ता, आता गुवाहाटीला जायची गरज नाही”: शहाजीबापू पाटील

Maharashtra Winter Session 2022: “पुढील १५ वर्ष मुंबईत आमचीच सत्ता, आता गुवाहाटीला जायची गरज नाही”: शहाजीबापू पाटील

Next

Gram Panchayat Election Result: राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढविली गेली नसली तरी विजयानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे भाजपने क्रमांक एकच्या जागा पटकाविल्याचे चित्र आहे. यातच ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी आता आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही, असे म्हटले आहे. 

शिंदे गटाला आता यापुढे महाराष्ट्रातून गुवाहटीला जावे लागणार नाही. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. पुढील १५ वर्ष तर मुंबईत आमचीच सत्ता राहणार असून, आता गुवाहटीला जाणार नाही, असे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. 

भाजप आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांनाच जनतेचा कौल

शिवसेना चिन्हावर ही निवडणूक लढवली गेल्याचा आरोप होतोय. मात्र चिन्ह कोणतेही असले तरी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनाच जनतेने कौल दिल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, ते मत पूर्णपणे अमृता फडणवीस यांचे आहे. मी महात्मा गांधी यांनाच राष्ट्रपिता मानतो. तर एक महान नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करतो, असे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राज्यात निवडणूक लागलेल्या ७ हजार ६८२ ग्रामपंचायतीपैकी भाजपने एकूण २ हजार ०२३ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादी राँग्रेसने १ हजार २१५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. तर शिंदे गट ७७२, काँग्रेसने ८६१, ठाकरे गट ६३९ तर इतर पक्षांनी १ हजार १३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: balasahebanchi shiv sena shinde group shahaji bapu patil said we do not have need to go at guwahati again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.