बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उखडा - अमित शाहंचा मुंबईत एल्गार

By admin | Published: September 4, 2014 07:43 PM2014-09-04T19:43:45+5:302014-09-04T19:43:45+5:30

निवडणुका कुणाच्या लाटेमुळे जिंकता येत नाहीत किंवा नेत्याच्या चांगल्या वक्त्यामुळे जिंकता येत नाहीत तर घरोघरी प्रचार करून कठोर परीश्रम घेणा-या कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका जिंकता येतात

Balasaheb's Maharashtra Congress-NCP Raised - Amit Shah's Elgar in Mumbai | बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उखडा - अमित शाहंचा मुंबईत एल्गार

बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उखडा - अमित शाहंचा मुंबईत एल्गार

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - निवडणुका कुणाच्या लाटेमुळे जिंकता येत नाहीत किंवा नेत्याच्या चांगल्या वक्त्यामुळे जिंकता येत नाहीत तर घरोघरी प्रचार करून कठोर परीश्रम घेणा-या कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका जिंकता येतात असे सांगत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी विजय संकल्प मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकले. काँग्रेस व राष्ट्रवादीचा कठोर शब्दांमध्ये समचार घेतलेल्या आपल्या भाषमामध्ये अमित शाह यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या चर्चा अफवांकडे दुर्लक्ष करावं, युती, जागावाटप, उमेदवार आदी बाबी नेत्यांवर सोडाव्या आणि फक्त विजयासाठी परीश्रम घ्यावेत असा सल्ला शाह यांनी दिला.
शाह यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
- अमेरिका इतकी वर्षे नरेंद्र मोदींशी कसे वागले हे आपण बघितलं आता तेही सबका साथ सबका विकास म्हणतायत.
- केंद्रामध्ये भाजपाचे यशस्वी सरकार हवं असेल आणि देश काँग्रेसमुक्त करायचा असेल तर महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करावा लागेल.
- कार्यकर्त्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनी राज्यभरातल्या घराघरात जायला हवं, शिवाजी महाराजांची आठवण आणि नरेंद्र मोदींचा संदेश देत सत्तापरीवर्तनासाठी कठोर परीश्रम घ्यायला हवेत.
- राजाच्या नियतीमध्ये खोट असेल तर निसर्गपण मदत करत नाही असे सांगताना दुष्काळग्रस्त गुजरातमध्ये १२ वर्षांत दुष्काळानं झोडपलं नाही तर महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांत सात वेळा दुष्काळ पडल्याचं सांगताना असं पापी सरकार उखडून टाका असं शाह म्हणाले.
- एकेकाळी देशाचे सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्व करत होतं. परंतु गेल्या १५ वर्षांमध्ये परिस्थिती अशी बदलली की प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडला व त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे शाह म्हणाले. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी दाऊद इब्राहिमसारख्या माफियांपासून महाराष्ट्राला सोडवलं असं शाह म्हणाले.
- पाकिस्तानशी चर्चा तोडण्याचा व जागतिक व्यापार संघटनेमध्ये आधीच्या चुकीच्या निर्णयाला फिरवण्याचा निर्णय भाजपाच्या खंबीर सरकारने त्वरीत घेतल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कृषिमंत्री शरद पवारांनी उद्योजकांच्या फायद्यासाठी शेतक-यांचा विश्वासघात केल्याची टीका केली.
- विकास हे या देशाचं पहिलं उद्दिष्ट आहे, पण त्याचबरोबर सम्मानपूर्वक जगायला हवं असं सांगतानाच शाह यांनी मोदी यांच्यावर कौतुकाची उधळण केली. मोदींसारखा पंतप्रधान मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं सांगतानाच त्यांचं स्वप्न महाराष्ट्रात काँग्रेसला उखडण्याचं असल्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
- महाराष्ट्रातपण भाजपानं असा विजय मिळवायला हवा की केंद्राप्रमाणेच इथेही विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसला झगडावं लागायला हवं - अमित शाह
- काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरात ११ लाख कोटी रुपये पोचल्याचा आरोप करतानाच महाराष्ट्रातून काँग्रेसला उखडण्याचं काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं असं त्यांनी ठासून सांगितलं.
- गेल्या १५ वर्षांमध्ये आघाडी सरकारने ११.८८ लाख करोड रुपये आघाडी सरकारने खाल्याचा आरोप शाह यांनी केला. त्यांच्या घोटाळ्यांची यादी एवढी मोठी आहे की भागवत सप्ताहाचा आठवडा कमी पडेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य नाही तर सुराज्य स्थापन केल्याचे सांगताना औरंगजेबाला टक्कर देत पहिल्यांदा स्वराज्य स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे अमित शाह म्हणाले.
- महाराष्ट्राने चारीत्र्यवान नेत्यांची फौज दिली होती, आता पुन्हा भाजपा असेच चारीत्र्यवान नेत्यांना पुढे आणेल असे शाह म्हणाले. गेल्या १५ वर्षांत सध्याच्या सरकारने देशभरात महाराष्ट्राचे नाव खराब केल्याचे ते म्हणाले.

Web Title: Balasaheb's Maharashtra Congress-NCP Raised - Amit Shah's Elgar in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.