सेना उभारणार बाळासाहेबांचे स्मारक
By admin | Published: August 8, 2014 02:44 AM2014-08-08T02:44:29+5:302014-08-08T02:44:29+5:30
शिवसेना-भाजपा महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.
Next
>मुंबई : शिवसेना-भाजपा महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल तसेच मुंबईतील पूर्व किना:याचा विकास करून युवासिटीची उभारणी केली जाईल आदी संकल्प असलेले शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सादर केले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे; मात्र शिवसेनेने त्याआधीच आपले व्हिजन डॉक्युमेंट दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या काही दिवसांत राज्याच्या दीर्घकालीन विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करणार आहेत. पण त्याच्याआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या कार्यक्रमात व्हिजन डॉक्युमेंट दिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत उद्धव पुढाकार घेत नसल्याची टीका मध्यंतरी झाली होती. तथापि, हे स्मारक उभारणारच असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
व्हिजन डॉक्युमेंटची वैशिष्टय़े
च्मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करणार, ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास, नवी मुंबई विमानतळ, रेसकोर्सच्या जागेत भव्य सार्वजनिक उद्यान, नागपूरला वाहतूक हब तर अमरावतीत कृषी हबची उभारणी.
च्लघू-मध्यम उद्योगांसाठी नवे धोरण, नियमित वीजपुरवठा, राज्यात पर्यटन सर्किटची उभारणी, पूर्णत्वाकडे असलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, सागरी किना:यावर मोठय़ा बंदरांची उभारणी, नवी औद्योगिक नगरे उभारणार.
च्गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे, नागपुरात अद्ययावत कर्करोग इस्पितळ, पोलीस दलातील रिक्तपदे वर्षभरात भरणार, प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रसाठीच्या योजनांचा या डॉक्युमेंटमध्ये समावेश आहे.
हायटेक शिवसेना : शिवसेनेच्या पदाधिका:यांशी आणि सामान्यांशी संपर्क साधण्यासाठी राज्यात एकूण 13 ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. टप्प्याटप्प्याने राज्यभर ही व्यवस्था पक्षातर्फे उभारली जाणार असून, ठाकरे हे एकावेळी अनेकांशी थेट संपर्क साधणार आहेत.