"बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे विखे पाटलांची की थोरातांची?; बाळासाहेब ठाकरे एकच"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 02:52 PM2022-10-11T14:52:07+5:302022-10-11T14:56:57+5:30
आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई - बाळासाहेब खूप आहेत परंतु बाळासाहेब ठाकरे एकमेव आहेत. त्यामुळे शिंदे गटाची शिवसेना नेमकी कुठल्या बाळासाहेबांची, विखे पाटील, थोरात, शिर्के, निंबाळकर अशी विचारणा सोशल मीडियात होत आहे. ठाकरे नाव आल्याशिवाय बाळासाहेब परिपूर्ण होत नाही. त्यामुळे ती शिवसेना कुणाची असा याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल असा टोला माजी महापौर आणि उद्धव गटाच्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जी मशाल आहे ती धगधगती आहे. नियतीने उत्तर दिल्यावर सगळे स्तब्ध होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जो नतमस्तक होतो त्याने धगधगती मशाल ह्दयात कायम ठेवणार आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी ३ नावे पाठवली. ३ चिन्ह पाठवली. त्यात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, चिन्ह मशाल हे निवडणूक आयोगाने दिली. परंतु शिवसैनिकांच्या मनाला उभारी देणारी नाव आणि चिन्ह मिळालं असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
नारायण राणेंचा टोला
तर ठाकरे गटाचं अज्ञान आहे. बाळासाहेब हे वडिलांचे नाव कसं बदलू शकतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, ते देवरस नाहीत. वरती फोटो बाळासाहेब ठाकरेंचा आहे. शिंदे गटाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असं नाव आहे. ती उद्धवची शिवसेना आहे. बाळासाहेबांचं नाव दुसरं आहे. त्यामुळे ती उद्धवची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मुख्यमंत्री आणि ४० आमदार असलेली बाळासाहेबांची शिवसेना वरचढ आहे. लवकरच उद्धवच्या शिवसेनेत उरलेले आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
अंधेरीचा पोटनिवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिंकेल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अवघड जाणार नाही. ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंकेल. परंतु या सगळ्या गोष्टी मनाला त्रास देणाऱ्या आहेत. काय झाले ते आम्ही पाहतोय. ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त सांडले. बलिदान दिले. मोरारजी देसाई यांनी गाडी थांबवली नाही त्यात एका शिवसैनिकाला चिरडले त्यानंतर मुंबई पेटली. ६९ शिवसैनिक दगावले. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो त्यात मी, नारायण राणे, राज ठाकरे असतील परंतु अशारितीने शिवसेनेच्या नावाला आव्हान कुणी दिलं नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"