गणेश विसपुते यांना बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार
By admin | Published: August 23, 2015 01:58 AM2015-08-23T01:58:40+5:302015-08-23T01:58:40+5:30
मराठीतील उत्तम अनुवादाचा प्रतिष्ठित बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अनुवादक गणेश विसपुते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार साकेत प्रकाशनच्या ‘माय नेम इज रेड’ या अनुवादित
मुंबई : मराठीतील उत्तम अनुवादाचा प्रतिष्ठित बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अनुवादक गणेश विसपुते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार साकेत प्रकाशनच्या ‘माय नेम इज रेड’ या अनुवादित पुस्तकासाठी देण्यात आला आहे. ओरहान पामुक यांनी लिहिलेल्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे.
या पुरस्काराचे हे ९वे वर्ष असून, रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. प्रा.
हरिश्चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखालील निवड
समितीने २०१३-१४ या वर्षामध्ये मराठी अनुवादित केलेल्या पुस्तकांतून ही निवड केली आहे. या समितीत दीपक घारे, चंद्रकांत भोंजाळ व प्रफुल्ल शिलेदार यांचा समावेश होता.
कवी विंदा करंदीकर यांना दिलेल्या कायम ठेव रकमेतून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार मराठीतील उत्कृष्ट अनुवादासाठी देण्यात येतो. विंदा करंदीकर यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपुर्द केली होती. त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषांतून मराठी भाषेत अनुवादित करण्यात आलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात येतो. (प्रतिनिधी)