बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट

By Admin | Published: June 18, 2016 04:20 PM2016-06-18T16:20:10+5:302016-06-18T16:20:10+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची एक वेगळीच ओळख आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान म्हणजे 'माईलस्टोनच' आहे

Balasheb Thackeray's life span | बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट

बाळासाहेब ठाकरेंचा जीवनपट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 19 - महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची एक वेगळीच ओळख आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान म्हणजे 'माईलस्टोनच'. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा करत असाल आणि त्यात बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नसेल तर आश्चर्यंच. आपल्या व्यंगचित्र आणि भाषणांनी शिवसैनिकांसोबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर त्यांनी राज्य केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले...जाणून घेऊया त्यांचा जीवनपट
 
२३ जानेवारी १९२७ : बाळासाहेब ठाकरेंचा पुणे येथे जन्म. शालेय जीवनातच चित्रकलेची प्रचंड आवड, खासकरून व्यंगचित्राची.
 
१९४५ : ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ‘कार्टुनिस्ट’ म्हणून काम सुरू केले.
 
१४ जून १९४८ : शिवसेनाप्रमुखांचा विवाह कु. सरला वैद्य यांच्यासोबत झाला.
 
१९५० : ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ’ सुरू झाली. ‘नवशक्ती’ व ‘फ्री प्रेस जर्नल’व्यतिरिक्त अन्यत्र ‘मावळा’ या नावाने व्यंगचित्राद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सामर्थ्य देण्याचे काम केले.
 
१३ ऑगस्ट १९६० : मराठीतील पहिले ‘व्यंगचित्र’ साप्ताहिक ‘मार्मिक’ची बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या समवेत सुरुवात. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन. ‘मार्मिक’ टिप्पणी करत साकारलेल्या व्यंगचित्रांसोबत ‘वाचा आणि थंड बसा’ असा उपरोधिक मथळा देऊन मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केले.
 
१९ जून १९६६ : शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवाजी पार्क येथील छोट्याशा घरात करण्यात आली. मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या न्याय्य हक्काचा लढा सुरू झाला.
 
३० ऑक्टोबर १९६६ : शिवसेनेची पहिली जाहीर सभा शिवतीर्थावर संपन्न झाली. या वेळी व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक होते. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे धोरण शिवसेनेने अंगिकारले.
 
१९६७ : शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक सामोरी आली ती ठाणे नगरपालिकेची. शिवसेनेचा प्रचंड विजय. ठाणे नगरपालिकेने शिवसेनेस पहिला ‘नगराध्यक्ष’ देण्याचा मान मिळविला.
 
९ ऑगस्ट १९६८ : कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘भारतीय कामगार सेने’ची स्थापना.
 
१९६९ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी रणशिंग फुंकले. शिवसेनाप्रमुखांना अटक. मुंबई पेटली.
 
१९६९ : शिवसेनाप्रमुखांना ३ महिने कारावास. आंदोलनात ६९ तरुणांनी बलिदान केले.
 
५ जून १९७० : ‘परळ विधानसभा’ पोटनिवडणुकीत १० पक्षांच्या आघाडीचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक यांचा विजय. महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून गेले.
 
१९७१ : मुंबई महानगरपालिकेत डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर विराजमान झाले.
 
१९७२ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रमोद नवलकर विजयी.
 
१९७२ : सरकारी/निमसरकारी कार्यालये आणि खाजगी कंपन्यांच्या कार्यालयातील नोकरभरतीत मराठी माणसांना-भूमिपुत्रांना प्राधान्य मिळविण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना.
२० नोव्हेंबर १९७३ : प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन.
 
१९७५ : आणीबाणीस पाठिंबा.
 
१९ जून १९७७ : दादर येथे शिवसेना भवनाचे उद्घाटन.
 
१९७८ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत. मुंबई महापालिकेतही पराभव. शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव राजीनामा मागे.
१९८५ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय. छगन भुजबळ महापौर.
 
१९८७ : हिंदुत्वाची भूमिका घेऊन ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिली. याच विचारावर विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक लढविली. मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू यांचा विजय.
२३ जानेवारी १९८९ : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू.  बाळासाहेब ठाकरेंनी संपादकाची जबाबदारी घेतली.
 
१९८९ : लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत युती झाली. शिवसेनेचे ४ उमेदवार विजयी झाले. प्रथमच लोकसभेत प्रवेश.
१९९० : शिवसेनाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या अमोघ वाणीने झंझावात निर्माण केला. शिवसेनेचे ५२ उमेदवार विजयी झाले.
 
६ डिसेंबर १९९२ : अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी याची जबाबदारी झटकली. अखेर हे काम शिवसैनिकांनी केल्याचे म्हटले गेले, त्यावर शिवसेनाप्रमुखांनी “हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान वाटतो” असे धाडसी उद्गार काढले.
१९९२-९३ : मुंबईत दंगल उसळली. अखेर शिवसेनेमुळे तमाम हिंदूंचे रक्षण झाले अशी भावना सर्वत्र झाली.
 
१९९५ : शिवसेना-भाजपा युतीने महाराष्ट्र राज्याची सत्ता काबीज केली. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर झाला.
१९९७ : मुंबई महानगरपालिकेवर विजय.
 
१९९८ : लोकसभा निवडणुकीत एन.डी.ए.चा विजय. शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात आले.
 
११ डिसेंबर १९९९ ते १० डिसेंबर २००५ : हिंदुत्वाच्या प्रचाराच्या मुद्यावरून ६ वर्षे शिवसेनाप्रमुखांवर मतदान करण्यास बंदी घातली गेली.
२० एप्रिल १९९६ : ज्येष्ठ सुपुत्र बिंदुमाधव यांचे अपघाती निधन.
 
६ सप्टेंबर १९९६ : पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन.
 
२००३ : महाबळेश्वर येथील शिबिरात उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
 
२००७ : शिवसेनेचा मुंबई आणि ठाणे महापालिकेवर पुनश्च विजय.
 
२०१० : युवा सेनेची स्थापना. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा नेतृत्वाची धुरा.
 
१७ नोव्हेंबर २०१२ :  ‘मातोश्री’ निवासस्थानी निधन.
(सौजन्य - http://shivsena.org/m/) 
 

Web Title: Balasheb Thackeray's life span

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.