बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली

By Admin | Published: August 24, 2014 02:50 AM2014-08-24T02:50:18+5:302014-08-24T02:50:18+5:30

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही शनिवारी एका शिवसैनिकाने शाई फेकण्याचा प्रयत्न केला.

Balasheb Thoratan poured ink on | बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली

बाळासाहेब थोरातांवर शाई फेकली

googlenewsNext
संगमनेर (जि. अहमदनगर) : सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्याची घटना ताजी असतानाच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही शनिवारी एका शिवसैनिकाने शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येत आह़े थोरात यांच्यावर शाई फेकणा:या भाऊसाहेब गणपत हासे याला अटक करण्यात आली आह़े  
नगर जिल्ह्याच्या दौ:यावर असलेल्या थोरात यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास राजापूर गावात ‘राजवर्धन युवा मंच’च्या फलकाचे अनावरण केले. त्यानंतर थोरात वाहनात बसत असताना गर्दीमधून आलेल्या भाऊसाहेब हासे याने थेट त्यांच्या दिशेने काळी शाई फेकली. तो युवा सेनेचा तालुकाध्यक्ष आहे. या वेळी थोरात यांच्या सोबत असलेले पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांच्या चेह:यासह संपूर्ण अंगावर शाई पडली. थोरात हे तातडीने घटनास्थळाहून पुढील नियोजित कार्यक्रमास निघून गेले.
या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शीनी हासे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हासे याच्या कार्यालय व दुकानाची मोडतोड केली. घटनेनंतर संतप्त काँग्रेस कार्यकत्र्यानी नाशिक-पुणो महामार्गावर रास्ता रोको केला. काँग्रेस पदाधिका:यांनी रविवारी संगमनेर बंदचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी संगमनेरला भेट देऊन आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले. काही विशिष्ट पक्षांकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा शोध घेऊ, असे मुख्यमंत्री   चव्हाण म्हणाले. मी महसूलमंत्री थोरात यांच्यासोबत होतो. राजापूरला फलकाचे अनावरण झाल्यावर गाडीत बसताना घोळक्यातून आलेल्या 4-5 जणांच्या हातात शाईच्या बाटल्या होत्या. भाऊसाहेब हासे याने 
थोरात यांच्या अंगावर शाई फेकली; परंतु मी पुढे असल्याने माङया अंगावरही पडल्याचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
ही घटना 
चुकीची, निंदनीय आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आहे. आरोपीविरुद्ध आधीचेही काही गुन्हे दाखल आहेत. त्यांची पडताळणी कडक कारवाई करू. 
- लखमी गौतम, पोलीस अधीक्षक
 
आघाडी सरकारचे काम बिघडविण्याचे हे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा हा उन्माद असून, महाराष्ट्रातील जनता अशा लोकांच्या हाती सत्ता देणार का? अशा प्रवृत्ती तपासून ठेचून काढल्या पाहिजेत. - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

 

Web Title: Balasheb Thoratan poured ink on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.