बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार

By Admin | Published: July 17, 2017 02:02 AM2017-07-17T02:02:39+5:302017-07-17T02:02:39+5:30

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी यंदाचा बालगंधर्व

Balkandharva Award for Bakul Pandit | बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार

बकुळ पंडित यांना बालगंधर्व पुरस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या आप्पा बाबलो गावकर तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबिवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला. गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हांबरे यांना गौरविण्यात आले.
प्रत्येकी ५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. द. कृ. लेले पुरस्काराने उल्हास केंजळे, बाल कलाकार निर्झरी चिंचाळकर आणि कार्तिकी भालेराव यांनाही सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमाक विजेत्या राधाकृष्ण कलामंदिर संस्थेचाही गौरव करण्यात आला. प्रभू यांच्या हस्ते ‘गंधर्वरंग’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Balkandharva Award for Bakul Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.