बालगोविंदांवर बंदी हवीच!
By admin | Published: August 10, 2014 02:50 AM2014-08-10T02:50:21+5:302014-08-10T02:50:21+5:30
बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढविण्यास बंदी घातली आहे.
Next
>मुंबई : बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढविण्यास बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध करीत दहीहंडी समन्वय समिती बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाच्या पाय:या ङिाजवत आहे. परंतु, शुक्रवारी नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान अपघात होऊन 14वर्षीय गोविंदाचा मृत्यू ओढवला. या पाश्र्वभूमीवर आता खासदार पूनम महाजन यांनीही महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांना बालगोविंदावर बंदी कायम असावी याकरिता साकडे घातले आहे.
महाजन यांनी यासंबंधी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई, ठाणो आणि नवी मुंबईत साधारण 12क्क् सार्वजनिक गोविंदा पथके आहेत. या प्रत्येक गोविंदा पथकात 5 ते 12 वय असणा:या जवळपास तीन-चार बालगोविंदांचा समावेश असतो. मात्र दहीहंडी उत्सवादरम्यान होणारे अपघात लक्षात घेता यामुळे बालगोविंदांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे बालगोविंदांच्या सुरक्षेचा विचार करून त्यासंबंधी घेण्यात आलेला निर्णय न बदलता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.
दहीहंडी उत्सव जवळ आल्यामुळे बालगोविंदाचा मुद्दा अधिकच चिघळला आहे. बालहक्क आयोगाच्या या निर्णयावर राज्य शासन नेमकी काय भूमिका घेणार,
याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
मुंबई : दहीहंडीच्या सरावादरम्यान गेल्या रविवारी (दि. 3) अपघात झालेला राजेंद्र बैकर (35) हा गोविंदा अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. केईएम रुग्णालयात दाखल असणा:या राजेंद्रवर शस्त्रक्रिया करून त्याचा मणका पूर्ववत बसविण्यात आला आहे. मात्र तरीही त्याला अर्धागवायू झाल्याने कोणतीच हालचाल करता येत नाही. अशा गंभीर स्थितीत असणारा राजेंद्र अजूनही मदतीच्या अपेक्षेत आहे.
च्करी रोड येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळात सहभागी होणारा राजेंद्र दुस:या किंवा तिस:या थरांवर चढायचा. 3 ऑगस्ट रोजी सरावादरम्यान तो दुस:या थरावर चढला होता. त्या वेळी, राजेंद्रच्या मानेला मार बसला होता. त्यानंतर, मंगळवारी राजेंद्रवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी त्याच्या मानेवर भार पडल्यामुळे मणक्याला दुखापत झाली. शस्त्रक्रियेद्वारे राजेंद्रचा मणका पूर्ववत बसविण्यात आला आहे.
च्श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष अंकुश गुरव यांनी सांगितले की, राजेंद्रला दुखापत झाल्यापासून दहीहंडी समन्वय समिती आणि नगरसेवकांची रीघ लागली आहे, मात्र अजूनही कोणीच मदत केलेली नाही. परंतु, मंडळाच्या वतीने राजेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांना लागणारे आर्थिक साहाय्य केले जात आहे. राजेंद्र हा खासगी कंपनीत नोकरी करीत असून, त्याला पाच आणि सात वर्षाची दोन अपत्ये आहेत.