आळंदीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

By admin | Published: June 22, 2016 05:59 PM2016-06-22T17:59:58+5:302016-06-22T17:59:58+5:30

आषाढी पायीवारी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदी शहरात नगर परिषदेने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे

Ban on Alandi Plastic Bags | आळंदीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

आळंदीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

Next

ऑनलाइन लोकमत
आळंदी, दि. 22 - आषाढी पायीवारी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदी शहरात नगर परिषदेने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही दिले असल्याचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले यांनी स्पष्ट केले आहे.
नगर परिषदेने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, शहरातील नागरिक, व्यापारी यांना नोटिसा दिल्या आहेत. महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २00६ व प्लॅस्टिक कॅरिबॅग्ज (हाताळणी व वापर) नियम २0११ नुसार वरील साहित्यासह थर्माकोलच्या पत्रावळ्यांचा वापर; तसेच व्यवसाय करणारे विक्रेते शहरात कोठेही आढळून आल्यास, संबंधितांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तरी यात्रा काळात अशा प्रकारचा प्रदूषित व्यवसाय करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, याची गंभीरपणे सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Ban on Alandi Plastic Bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.