कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला
By Admin | Published: June 25, 2016 03:37 AM2016-06-25T03:37:12+5:302016-06-25T03:37:12+5:30
कोंबड्यांची झुंज लावणे, हे प्रथमदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला. तसेच झुंज लावणाऱ्या आयोजकांवर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
मुंबई : कोंबड्यांची झुंज लावणे, हे प्रथमदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घाला. तसेच झुंज लावणाऱ्या आयोजकांवर कारवाई करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.
कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घालून ‘प्रिव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट’ची अंमलबजावणी करा, असे निर्देश न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सरकारला दिले.
गेल्यावर्षी उल्हासनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोंबड्यांच्या झुंजींविरोधात एन. जी. जयसिम्हा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात नाही, तोपर्यंत कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार नाही. लोकांना कायद्यातील तरतुदीविषयी माहिती देण्यात
येण्यात यावी. त्यामुळे प्राण्यांशी क्रूरपणे वागणे थांबेल, असे याचिकेत म्हटले आहे.
झुंजीमुळे कोंबड्यांना दुखापत होते. त्यांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे अशा झुंजींचे आयोजन करण्यात येऊ नये. त्यासाठी सरकारला बंदी घालण्याचा आदेश द्यावा,
अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
गेल्यावर्षी न्यायालयाने उल्हासनगरमधील आयोजकांना कोंबड्यांची झुंज आयोजित करण्यास बंदी घातली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा आयोजकांनी कोंबड्यांची झुंज लावणार नाही, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
या आश्वासनानंतर उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. याचिकेनुसार झुंजीपूर्वी कोंबड्यांच्या पायाला रेझर, ब्लेड किंवा त्याने आग्रमक व्हावे यासाठी स्टिरॉइड देण्यात येते. त्यामुळे दोन्ही बाजूंचे कोंबडे जखमी होतात.